Mumbai Indians Head Coach Ahead of IPL 2025: आयपीएल २०२५ पूर्वी अनेक संघांमध्ये मोठे बदल घडताना पाहायला मिळू शकते. यंदाच्या आयपीएलपूर्वी काही संघांनी आपल्या संघाचा प्रशिक्षक वर्ग बदलला आहे, तर होणाऱ्या लिलावापूर्वी संघ चांगलीच तयारी करत आहे. आता चॅम्पियन संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सनेही नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने मार्क बाऊचरच्या जागी व्हीडिओ शेअर करत नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याची संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. महेला जयवर्धने यापूर्वीही गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आता पुन्हा एकदा त्याला आयपीएल २०२५ साठी संघात सामील केले आहे. याची घोषणा मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे.

Kashmir youth employment, Pune organisation,
काश्मीर खोऱ्यातील तरुणही आता रोजगाराभिमुख, पुण्यातील संस्थांचा लष्काराच्या मदतीने पुढाकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024, airoli,
ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
mp shahu chhatrapati announce india alliance support to rajesh latkar independent candidate of kolhapur north assembly constituency
कोल्हापुरात राजेश लाटकर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार
Yogendra Yadav belief of Bharat Jodo Abhiyaan about Maharashtra politics print politics news
महाराष्ट्र राजकारणाची दशा आणि दिशा ठरवेल; ‘भारत जोडो अभियाना’चे योगेंद्र यादव यांचा विश्वास
neral matheran toy train service
माथेरानच्या राणीची आजपासून सफर
Worli constituency tricolor fight between Shiv Sena MNS and Shinde groups
प्रमुख पक्षांकडून ‘वरळी’कर उमेदवारच नाही

हेही वाचा –

IND W vs AUS W: भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध किती धावांनी विजय आवश्यक? कसं आहे समीकरण

मार्क बाउचर २०२३ आणि २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र आता त्याची जागा जयवर्धने घेणार आहे. जयवर्धनेचा प्रशिक्षक म्हणून चांगला रेकॉर्ड आहे. जयवर्धनेच्या उपस्थितीत मुंबईने तीन विजेतेपद पटकावले. या संघाने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०२२ मध्ये मुंबईने जयवर्धनेकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्याला क्रिकेटचे ग्लोबल हेड बनवण्यात आले. या काळात त्याने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सलाही मदत केली. तो MLC आणि MIE साठी देखील महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसला.

हेही वचा – IND vs BAN: टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक सामना, एकामागून एक भारताने मोडले टी-२० मधील मोठे विक्रम, वाचा विक्रमांची यादी

मुंबई इंडियन्ससाठी २०२४ चा सीझन खूपच खराब

आयपीएल २०२४ मुंबईसाठी खूप वाईट होते. मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर दिली गेली. गुणतालिकेत संघ तळाच्या स्थानावर होता. मुंबईने या मोसमात एकूण १४ सामने खेळले आणि केवळ ४ सामने जिंकले. एमआयला १० सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या संघात अनेक मोठे खेळाडू होते. पण तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – Hardik Pandya: “अखेर मला असा कोणीतरी भेटला…”, म्हणत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने शेअर केले हार्दिक पंड्याबरोबरचे फोटो

मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानीने महेला जयवर्धनेची मुथ्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतर सांगितले, “मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून महेला जयवर्धने परत आल्याने आम्ही आनंदी आहोत. आमच्या जागतिक संघांनंतर आता MI मध्ये जयवर्धनेला परत आणण्याची संधी निर्माण झाली. त्याचे नेतृत्व, ज्ञान आणि खेळाबद्दलची आवड यांचा एमआयला नेहमीच फायदा झाला आहे. मार्क बाउचरचे गेल्या दोन मोसमातील योगदानाबद्दल आभार मानण्याची ही संधी मी घेऊ इच्छितो. मार्क बाऊचरच्या कार्यकाळात त्यांचे कौशल्य आणि समर्पण महत्त्वपूर्ण होते आणि आता ते MI कुटुंबाचे अविभाज्य सदस्य बनले आहेत, ”आकाश अंबानी यांनी एका मीडिया रिलीझमध्ये म्हटले आहे.