मुंबई इंडियन्सच्या संघाने अजून एक ट्रॉफी त्यांच्या खात्यात जमा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या महिला मुंबई इंडियन्स संघाने वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत दुसरे जेतेपद पटकाले. मुंबई इंडियन्स WPL च्या तीन सीझनमध्ये दोन जेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स संघाने २०२३ आणि २०२५ मध्ये दोन अंतिम सामने खेळले आणि दोन्ही सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवत जेतेपद नावे केले. मुंबई इंडियन्स एक यशस्वी टी-२० लीगमधील फ्रँचायझी असून संघाने आतापर्यंत १२ विजेतेपद पटकावली आहेत. मुंबई इंडियन्स ही टी-२० वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२ जेतेपद पटकावणारी पहिली फ्रँचायझी आहे. या संघाच्या आसपास इतर कोणतीच फ्रँचायझी नाही.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची आयपीएल स्पर्धेतील संघ म्हणून २००८ मध्ये स्थापना झाली. जगातील फ्रँचायझी टी-२० लीगमध्ये काळानुरूप मुंबई इंडियन्सने हळूहळू आपले प्रस्थ वाढवले. भारतातील प्रसिद्ध आयपीएल टी-२० लीगनंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी२० लीग आणि यूएईच्या टी२० लीगमध्ये संघ खरेदी केला. द हंड्रेड स्पर्धेतही मुंबई इंडियन्स हा मुकेश अंबानींच्या मालकीचा संघ आहे.
२००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या स्थापनेसह स्थापन झालेल्या एमआय फ्रँचायझीने जगातील फ्रँचायझी टी२० क्रिकेट लीगमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी२० लीग आणि यूएईच्या टी२० लीगमध्ये संघ खरेदी केले असताना, एमआयने द हंड्रेडमध्येही गुंतवणूक केली.
आयपीएलच्या सुरुवातीच्या काही हंगामात त्यांना संघर्ष करावा लागला असला तरी, मुंबई इंडियन्सने त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये सलग विजेतेपद मिळवली आहेत. सध्या बंद झालेल्या चॅम्पियन्स लीग टी-२० च्या रूपात मुंबई इंडियन्सने पहिले जेतेपद मिळवले आणि नंतर आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी केली. २०११ पासून, मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाने पाच आयपीएल जेतेपदं आणि दोन सीएलटी२० ट्रॉफीसह सात जेतेपदे जिंकली. रोहित शर्माकडे २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आणि २०२० पर्यंत एमआयच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये एकामागून एक जेतेपदांची भर घातली.
आयपीएलमधील यशानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एमआयने फ्रँचायझी म्हणून अधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत, २०२३ मध्ये महिला प्रीमियर लीगपासून सुरुवात झाली आणि त्यानंतर मेजर लीग क्रिकेट (एमएलसी), इंटरनॅशनल लीग टी२० (आयएलटी२०) आणि एसए२० मध्ये संघाने प्रत्येकी ट्रॉफी जिंकली आणि शनिवारी (१५ मार्च) आणखी एक WPL चे जेतेपद संघाच्या नावे केले.
मुंबई इंडियन्सच्या कॅबिनेटमधील एकूण १२ ट्रॉफी कोणकोणत्या आहेत?
२०११: मुंबई इंडियन्स – चॅम्पियन्स लीग टी२०
२०१३: मुंबई इंडियन्स – आयपीएल
२०१३: मुंबई इंडियन्स – चॅम्पियन्स लीग टी२०
२०१५: मुंबई इंडियन्स – आयपीएल
२०१७: मुंबई इंडियन्स – आयपीएल
२०१९: मुंबई इंडियन्स – आयपीएल
२०२०: मुंबई इंडियन्स – आयपीएल
२०२३: मुंबई इंडियन्स – वुमन्स प्रीमियर लीग
२०२३: एमआय न्यू यॉर्क – एमएलसी
२०२४: एमआय एमिरेट्स – आयएलटी२०
२०२५: एमआय केप टाउन – एसए२०
२०२५: मुंबई इंडियन्स – वुमन्स प्रीमियर लीग
मुंबई इंडियन्स किंवा एमआय फ्रँचायझी अंतिम फेरीत कायमच आपल्या जबरदस्त कामगिरीबाबत ओळखले जाते, ज्यामुळे ते कोणत्याही स्पर्धेत किंवा लीगमध्ये चॅम्पियन संघ का आहेत हे दिसून येते. एमआय फ्रँचायझी आतापर्यंत अंतिम फेरीत फक्त एकदाच पराभूत झाली आहे, २०१० मध्ये आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध जेतेपदाचा सामना गमावला होता.
एमआय फ्रँचायझी फायनलमधील रेकॉर्ड
एमआय: ८ फायनलमध्ये ७ विजय (आयपीएल – ६ पैकी ५ विजय आणि सीएलटी२० – २ पैकी २ विजय)
एमआय महिला: २ फायनलमध्ये २ विजय ( WPL)
एमआय न्यू यॉर्क: त्यांच्या एकमेव फायनलमध्ये विजय (MLC 2023)
एमआय एमिरेट्स: एकमेव फायनलमध्ये विजय (ILT20 2024)
एमआय केप टाउन: एकमेव फायनलमध्ये विजय