आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. जेतेपदाचे दावेदार मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आज शुक्रवारी (१३ ऑगस्ट) यूएईसाठी रवाना झाले आहेत. आयपीएलच्या तयारीसाठी दोन्ही संघ एक महिन्यापूर्वी यूएईला जात आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर उभा ठाकणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा, ऋतुराज गायकवाड यांनी यूएईसाठी उड्डाण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीएसकेने आपल्या ट्विटर हँडलवर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो हातात बॅग घेऊन मास्क घातलेला दिसत आहे. यूएईमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडू आणि इतर सदस्यांना ७ दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. यानंतर, करोनाच्या निगेटिव्ह चाचणीनंतर खेळाडू प्रशिक्षण घेऊ शकतील.

करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. आता या लीगच्या आयोजनाची तारीखही समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे.

हेही वाचा – अन् ती हो म्हणाली..! राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू लवकरच करणार लग्न

आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे.