Mumbai Indians bought auto driver’s daughter Keerthana Balakrishnan : तामिळनाडूच्या कीर्तना बालकृष्णनला डब्ल्यूपीएल २०२४ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने तिच्या मूळ किमतीत (रु. १० लाख) विकत घेतले. या स्पर्धेत खेळणारी ती तामिळनाडू राज्यातील पहिली क्रिकेटपटू ठरणार आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने कीर्तनाची संपूर्ण कुंडली काढली आहे. कार्तिकने ट्विटरवर एका पोस्टद्वारे कीर्तनाबद्दल सर्व काही सांगितले आहे. त्याचबरोबर डब्ल्यूपीएलमध्ये खेळणारी ती तामिळनाडूची पहिली क्रिकेटपटू बनल्याचा अभिमान वाटत असल्याचे कार्तिकने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनव मुकुंदच्या वडिलांकडून घेतले प्रशिक्षण –

दिनेश कार्तिकने सांगितले की, लिलावात कीर्तनाची विक्री करणे ही एक मोठी गोष्ट आहे. कारण क्रिकेटच्या जगात अनेक नायक आहेत, परंतु प्रत्येकाला संधी मिळत नाही. कार्तिक म्हणाला, कीर्तनाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, असे नाही. तिने भारतीय क्रिकेटपटू अभिनव मुकुंदचे वडील टीएस मुकुंद यांच्या अकादमीतून प्रशिक्षण घेतले आहे. टीएस मुकुंद आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुण क्रिकेटपटूंना पैशाशिवाय प्रशिक्षण देतात आणि कीर्तनानेही असेच प्रशिक्षण घेतले आहे. कीर्तना ही उजव्या हाताची फलंदाज आणि लेगस्पिनर असून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करते.

कीर्तनाची पार्श्वभूमी –

दिनेश कार्तिकने सांगितले की, कीर्तनाची पार्श्वभूमी अगदी साधी आहे. तिचे वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत, पण डब्ल्यूपीएलमधील यशस्वी संघात निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही चांगली होईल. ही २३ वर्षीय खेळाडू हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार असून तिला स्पर्धेत आपली छाप सोडायला आवडेल. कीर्तना व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सने अष्टपैलू खेळाडू अमनदीप कौर, एस सजना, फातिमा जाफर आणि दक्षिण आफ्रिकेची माजी वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल यांचा संघात समावेश केला आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : विराट-रोहितच्या खेळण्यावर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘टी-२० विश्वचषकासाठी दोन्ही खेळाडूंची…’

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कीर्तनाची कामगिरी –

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू महिला, भारतीय ग्रीन महिला, दक्षिण विभागीय महिला आणि ऑरेंज ड्रॅगन महिला संघांकडून खेळली आहे. कीर्तना भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठे नाव बनणार आहे. तिने २०२१-२१ मध्ये फ्रीयर कपमध्ये ३४ च्या सरासरीने आणि ८६ च्या स्ट्राइक रेटने १०२ धावा केल्या होत्या. तसेच तिने चार विकेट्सही घेतल्या होत्या. या एकदिवसीय स्पर्धेत तामिळनाडूकडून खेळताना तिने तिनदा तीन विकेट्स घेतल्या आहेत.