आयपीएल २०१४ साठीच्या खेळाडूंचा लिलाव येत्या फेब्रुवारी महिन्याच्या १२ तारखेला होणार आहे. मात्र, आयपीएलच्या दोन बहुचर्चित मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. कारण, मुंबई इंडियन्सचे मागील वर्षीचे जेतेपद आणि धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाची लोकप्रियता पाहता दोन्ही संघ आपला मागील वर्षाचाच संघ यावेळी कायम राखण्याच्या प्रयत्नात असतील.
चेन्नईचा कॅप्टनकुल धोनीच्या संघात सुरेश रैना, रविंद्र जडेजा, आर.अश्विन या खेळाडूंचे स्थानतर संघ राखीवच ठेवेल. त्यात ड्वेन ब्रावो आणि ड्युप्लेसी या दोघांपैकी एकाला राखीव ठेवण्याच्या निर्णयात चेन्नई कोणाला प्राधान्य देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुसऱया बाजूला मुंबई इंडियन्स संघ यावेळी सचिनशिवाय खेळताना दिसेल. रोहीत शर्माच्या खांद्यावर संघाची धुरा देण्याची शक्यता जास्त आहे. लोकप्रिय केरॉन पोलार्ड आणि भेदक गोलंदाज लसीथ मलिंगा यांना मुंबई इंडियन्स संघात कायम राखेल तसेच ऑस्ट्रेलियाची मशिनगन मिचेल जॉन्सन सध्या फॉर्मात असल्याने मिचेललाही संघ या पर्वातही कायम राखेल यात शंका नाही.
मागील पर्वात पराभवाने पछाडलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची यावेळी नव्याने सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. संघ संचालक यावेळी संपूर्णत: नव्याने खेळाडू संघात सामील करण्याच्या उद्देशाने लिलावाला उपस्थित राहतील. काही खेळाडू वगळता दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात नव्या खेळाडूंना सामील करून घेण्याच्या प्रयत्नात असेल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा