हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्त केल्यावरून ट्रोलिंग सुरू असतानाच मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूंनी ट्वेन्टी२० वर्ल्डकपसाठीच्या संघात बाजी मारली आहे. भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे तर हार्दिक उपकर्णधार असणार आहे. हे दोघेही मुंबई संघाचे आधारस्तंभ आहेत. न्यू ३६० अर्थात सूर्यकुमार यादव आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहेत.

यंदाचा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने आयपीएल स्पर्धेची ५ जेतेपदं पटकावली आहेत. रोहितच्याच नेतृत्वात भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. भविष्याचा विचार करुन मुंबई संघव्यवस्थापनाने ट्रेडऑफ होऊन आलेल्या हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. हार्दिक अनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघाचाच भाग होता. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणाच्या हंगामातच जेतेपदाची कमाई केली. पुढच्याच हंगामात त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान

विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे संयमी नेतृत्व करत आहे. आणखी एका विजयानंतर राजस्थानचा प्लेऑफमधला प्रवेश पक्का होईल. संजूची बॅटही तळपते आहे. संजूचा सहकारी धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालने भारतीय संघात स्थान पटकावलं आहे. संजूचा अनुभवी सहकारी युझवेंद्र चहलचं आठ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स नावावर असणारा चहल यंदाही उत्तम कामगिरी करतो आहे.

अपघातामुळे दीड वर्ष क्रिकेटपासून दूर राहिलेल्या ऋषभ पंतने भारतीय संघात दिमाखात पुनरागमन केलं आहे. ऋषभने एनसीएत कसून मेहनत करून फिटनेस जपला आहे. ऋषभच्या बरोबरीने कुलदीप यादव आणि अक्षर पटेल ही फिरकीद्वयी भारतीय संघात आहे. कुलदीप सुरेख फॉर्मात आहे तर अक्षर गोलंदाजीच्या बरोबरीने फलंदाजीतही योगदान देतो आहे.

सगळे हंगाम खेळूनही जेतेपदाच्या शर्यतीत नसणाऱ्या बंगळुरू संघाचे दोन शिलेदार भारतीय संघात आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं नावावर असणारा विराट कोहली भारतीय संघाचा कणा आहे. कोहलीच्या बरोबरीने मोहम्मद सिराज भारतीय संघात आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात सिराजची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. पण तरीही निवडसमितीने त्याच्या गुणकौशल्यांवर विश्वास ठेवला आहे.

अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे दोघेही चेन्नईकडून खेळतात. शिवम प्रामुख्याने यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करतो आहे. चेन्नईसाठी चौथ्या क्रमांकावर खेळताना शिवमने शानदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे चेन्नईंचं फिरकी आक्रमण जडेजाने समर्थपणे सांभाळलं आहे. तो फलंदाजीतही योगदान देतो आहे.

पंजाब संघातून अर्शदीप सिंगने भारतीय संघात स्थान पटकावलं आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज डावाच्या सुरुवातीला महत्त्वपूर्ण ठरू शकतात हे लक्षात घेऊन अर्शदीपची निवड करण्यात आली आहे.

योगायोग म्हणजे सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपरजायंट्स या संघांपैकी एकाही खेळाडूला भारतीय संघात स्थान पटकावता आलेलं नाही. हैदराबादचा धडाकेबाज सलामीवीर आणि अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माला संघात घ्यावं असं असंख्य चाहत्यांना वाटत होतं. त्याचवेळी शाहबाझ अहमद, वॉशिंग्टन सुंदर यांनाही संधी मिळावी असा आग्रह होता. अनुभवी भुवनेश्वर कुमार आता निवडसमितीच्या योजनांमध्ये नाही हे स्पष्ट झालं आहे. टी.नटराजन भारतासाठी खेळला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी करतो आहे पण वर्ल्डकपसाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकलेला नाही.

यंदाच्या आयपीएल हंगामात भन्नाट वेगाने सगळ्यांना प्रभावित करणारा मयंक यादवला भारतीय संघात स्थान मिळावं अशी चर्चा रंगली होती. पण मयंककडे डोमेस्टिक क्रिकेटचा पुरेसा अनुभव नाही. आयपीएलचाही अनुभव नाही. त्यामुळे निवडसमितीने मयंकची निवड केलेली नाही. लखनौचा कर्णधार राहुलला संघात स्थान मिळालेलं नाही. स्ट्राईकरेटच्या मुद्यावरून राहुलवर सातत्याने टीका होत होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकप संघात दीपक हुड्डाचा समावेश होता. मात्र यंदा निवडसमितीने हुड्डाचा विचार केलेला नाही. कृणाल पंड्या, रवी बिश्नोई यांनाही संधी मिळू शकलेली नाही.