आयपीएलच्या महालिलावादरम्यान, मुंबई इंडियन्सने आपला संघ तयार करण्यासाठी हुशारीने खेळी केली. लिलावाच्या दोन्ही दिवशी काही मोठी नावे मुंबईत सामील झाली होती. पहिल्याच दिवशी मुंबईने इशान किशनला १५.२५ कोटींमध्ये खरेदी करून मोठा धमाका केला.
दुसऱ्या दिवसाच्या लिलावात मुंबई इंडियन्सचे लक्ष जोफ्रा आर्चरवर होते. मुंबईने इतर संघांसह बोली युद्ध जिंकले आणि आर्चरला ८ कोटी रुपयांना विकत घेतले. राजस्थान रॉयल्ससह इतर संघांनीही आर्चरसाठी बोली लावली होती पण मुंबईकडे त्यांच्या पर्समध्ये भरपूर पैसे होते आणि त्यांनी ते वापरले. आर्चरशिवाय मुंबईने टीम डेव्हिडचाही आपल्या संघात समावेश केला आहे. अनेक संघांनी उंचपुऱ्या डेव्हिडसाठी बोलीही लावली, पण मुंबईने शेवटपर्यंत बोली लावली आणि त्याला ८.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.
हेही वाचा – VIDEO : मुंबई इंडियन्सनं संघात घेतल्यानंतर अर्जुन तेंडुलकर म्हणतो, ‘‘मी संघमालक…”
पहिल्या दिवसाच्या लिलावात मुंबई इंडियन्सची फळी शांत दिसत होती, पण दुसऱ्या दिवशी काही खेळाडू त्यांच्या निशाण्यावर होते. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला मुंबईने विकत घेतले. यावेळीही सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने संघात सामील केले. गेल्या वर्षीही अर्जुन मुंबई संघात होता. त्याच्यासोबत मुंबईने टायमल मिल्सचाही समावेश केला. अशाप्रकारे, संघमालंकाना बोलीमध्ये लक्ष्यित केलेली नावे खरेदी करण्यात त्यांना यश आले.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अनमोलप्रीत सिंग, अर्शद खान, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, बेसिल थंपी, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्जुन तेंडुलकर, मयंक मार्कंडे, डॅनियल सॅम्स, डेवॉल्ड ब्रेविस, हृतिक शोकिन, संजय यादव, टिम डेव्हिड, इशान किशन, फॅबियन एलन, आर्यन जुयाल.