इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी टीम मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर झाला आहे. दुखापतीमुळे तो एकही सामना न खेळता आयपीएलच्या १४ व्या हंगामाबाहेर झाला. मुंबई इंडियन्सने याबाबत माहिती दिली. त्याच्या जागी गोलंदाज सिमरजीत सिंगला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना पाहण्याच्या चाहत्यांच्या आशांना धक्का बसला आहे. गेल्या वर्षी झालेल्या लिलावात अर्जुनला २० लाखांची बोली लावत मुंबईने आपल्या ताफ्यात सामील केले. दुखापतीमुळे तो यापुढे स्पर्धेच्या सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध राहणार नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – T20 World Cup : पाकिस्तानला ‘जबर’ धक्का! भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘दिग्गज’ खेळाडूला झाला डेंग्यू

अर्जुन नेट गोलंदाज म्हणून संघाच्या फलंदाजांना प्रशिक्षण देत होता. त्याला मुंबईकडून खेळणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर ११ पैकी ५ सामने जिंकल्यानंतर हा संघ गुणतालिकेत १० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यूएईमध्ये पोहोचल्यानंतर मुंबईचा संघ ४ सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकू शकला आहे.

Story img Loader