Mujeeb Ur Rahman replaces AM Ghazanfar in Mumbai Indians for IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यासाठी सर्व १० संघांनी आधीच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाने आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात केलेला बदल जाहीर केला आहे. खरंतर, मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग असलेला अल्लाह गझनफर दुखापतीमुळे आगामी आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. आता त्याच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केले आहे.

मुजीब उर रहमानला मिळाली संधी –

आयपीएल २०२५ च्या लिलावात, कोणत्याही संघाने २३ वर्षीय अफगाणिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानला संघाचा भाग बनवण्यास रस दाखवला नव्हता. आता, अल्लाह गझनफर दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्या जागी मुजीब उर रहमानला संधी दिली आहे. मुजीब अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या अफगाणिस्तान संघाचाही तो भाग नाही. मात्र, आयपीएलच्या १८ व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी मुजीब पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत तो संपूर्ण हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल.

मुजीब आतापर्यंत आयपीएलमध्ये या २ संघांसाठी खेळलाय –

मुजीब उर रहमानबद्दल बोलायचे झाले तर, तो आतापर्यंत आयपीएलमध्ये २ संघांसाठी खेळला आहे. ज्यामध्ये त्याने पंजाब किंग्ज संघाकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद संघाचाही भाग होता. मुजीबने शेवटचा आयपीएल सामना २०२१ मध्ये खेळला होता. आतापर्यंत मुजीबला आयपीएलमध्ये १९ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने ३१.१६ च्या सरासरीने १९ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी २७ धावांत ३ विकेट्स होती.

मुजीबला किती पैसे मिळणार?

दुखापतीमुळे अल्लाह गझनफर हंगामाबाहेर आहे. मुजीब हा उजव्या हाताचा ऑफस्पिनर आहे आणि त्याने १९ आयपीएल सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये १९ विकेट्स आहेत. तो २ कोटी रुपयांना मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. मुजीब हा अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक होता. त्याने वयाच्या १७ व्या वर्षीच आपला प्रभाव दाखवून दिला.

Story img Loader