आयपीएलच्या बाराव्या हंगामात दुखापतग्रस्त अल्झारी जोसेफच्या जागी मुंबई इंडियन्सने अखेर पर्याय शोधला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा जलदगती गोलंदाज ब्युरन हेंड्रीक्सला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. उर्वरित सामन्यांसाठी हेंड्रीक्स मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करेल.
अवश्य वाचा – IPL 2019 : सलग पाच सामन्यांमध्ये भोपळे, टर्नर ठरला नकोशा विक्रमाचा मानकरी
हंगाम सुरु होण्याआधी न्यूझीलंडच्या अॅडम मिलनने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या जागेवर अल्झारी जोसेफची मुंबईच्या संघात निवड झाली होती. आपल्या पदार्पणाच्या हंगामातचं जोसेफने ६/१२ अशी सर्वोत्तम कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. अल्झारी जोसेफच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे उरलेल्या सामन्यात हेंड्रिक्सला मुंबईच्या संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.