IPL 2023 Updates: यंदा आयपीएलचा सोळावा हंगाम खेळला जाणार आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी मुंबई इंडियन्सला संघाला मोठा धक्का बसला आहे. झाय रिचर्डसनला आयपीएलमधून बाहेर पडला आहे. हॅमस्ट्रिंग मधून सावरण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रियेनंतर तो ऍशेस मालिकेततूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात क्लब क्रिकेट खेळताना रिचर्डसनला पुन्हा दुखापत झाली. त्याला पहिल्यांदा बीबीएलमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला भारतातील एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले होते. यानंतर त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय देण्यात आला आहे.

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा

दुखापती हा क्रिकेटचा मोठा भाग –

तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार होता. त्याला एमआयने लिलावात दीड कोटींना विकत घेतले होते. पंजाब किंग्जसोबत एका मोसमानंतर स्पर्धेतील हा त्याचा दुसरा कार्यकाळ ठरला असता. त्याचे बाहेर पडणे मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का ठरेल. कारण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही बाहेर पडण्याची शक्यता आहे. रिचर्डसन 140KPH वेगाने गोलंदाजी करतो.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: शुबमन गिलने मोडला पाकिस्तानच्या युनूस खानचा विक्रम; मिचेल स्टार्कची धुलाई करत रचला विश्वविक्रम

त्याच्या दुखापतीबाबत रिचर्डसनने ट्विट केले की, दुखापती हा क्रिकेटचा मोठा भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. “एकदम निराशाजनक? एकदम. “पण मी आता अशा परिस्थितीत आहे, जिथे मला जे आवडते ते मी करू शकतो. आणखी चांगला खेळाडू होण्यासाठी मी खूप मेहनत घेईन. एक पाऊल मागे, तर दोन पाऊल पुढे. चला करूया.”

रिचर्डसन बराच काळ दुखापतीशी झुंज देतोय –

रिचर्डसन बराच काळ दुखापतीशी झुंज देत आहे. २०१९ मध्ये खांद्यावर मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तो त्या वर्षीचा एकदिवसीय विश्वचषक आणि ऍशेसमधून बाहेर पडला होता. त्याने डिसेंबर २०२१ मध्ये अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पुनरागमानात पाच बळी घेतले. त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्यापासून ही त्याची पहिलीच कसोटी होती, परंतु त्यानंतरच्या टाचेच्या दुखापतीने त्याला पुढील सामन्यातून बाहेर व्हावे लागले. त्यानंतर तो कसोटी क्रिकेट खेळला नाही.

हेही वाचा – Hardik Vs Krunal: आयपीएलपूर्वी पांड्या बंधूंचा घरातच रंगला सामना; दोघांमधील सामन्याचा VIDEO होतोय व्हायरल

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अॅडम व्होगेस म्हणाले, “आम्ही सर्वजण झायबद्दल समजू शकतो. तो लवकर बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही त्याला तिथून परत आणू शकतो. कारण त्याचे १२ महिने कठीण गेले आहेत.”