WPL 2023 Mumbai Indians Jersey Launch: महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगामा ४ मार्च पासून सुरु होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.असे असताना मुंबई इंडियन्सने या स्पर्धेसाठी आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. त्यामुळे यावर्षी आता मुंबई इंडियन्सच्या खेळाडू नव्या अवतारात दिसणार आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत पेजवर एक व्हिडिओ शेअर करून जर्सीचे अनावरण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४ मार्चला पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात हरमनप्रीत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्तव करताना दिसेल.स्पर्धेत एकूण ५ संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ समजला जातो आहे. या संघाने आत्तापर्यंत एकूण ५ विजेतेपदे जिंकली आहेत. यंदाही महिला प्रीमियर लीगमध्ये या संघाला त्यांचे साम्राज्य गाजवायचे आहे. मुंबई इंडियन्सच्या महिला संघाने महिला प्रीमियर लीगच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

संघाने प्रशिक्षण सुरू केले आहे, तथापि, हरमनप्रीत कौरसह अनेक खेळाडू अद्याप सराव सत्रांना उपस्थित राहिलेले नाहीत. कारण ते दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकात व्यस्त होते. तसेच इतर खेळाडू देखील १ ते २ दिवसात संघात सामील होतील.

मुंबई इंडियन्सच्या जर्सीचे अनावरण –

शनिवारी मुंबई इंडियन्सने महिला संघाच्या जर्सीचे अनावरण केले. टीमने एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी पुरुष संघासारखी दिसते. जर्सी हलक्या निळ्या रंगाची असून बाजूला गडद रंगाची पट्टी आहे.

हेही वाचा – Sarah Taylor: ‘होय, मी लेस्बियन आहे…’, विराट कोहलीला प्रपोज करणारी महिला क्रिकेटर ट्रोलर्सवर भडकली

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक संघात शार्लोट एडवर्ड्स (मुख्य प्रशिक्षक), झुलन गोस्वामी (संघ मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक) आणि देविका पळशीकर (फलंदाजी प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. उद्घाटन हंगामात, पाच संघ दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना संघात घेण्यासाठी खूप पैसा खर्च केला.

महिला प्रीमियर लीगसाठी मुंबई इंडियन्सचा संघ –

हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्रकर, अमेली केर, नेट सिव्हर, धारा गुजर, सायका इशाक, अमनजोत कौर, इसी वांग, हीदर ग्रॅहम, हेली मॅथ्यूज, शोले ट्रायन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, नीलम बिष्ट आणि जिंतिमणी कलिता

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians team jersey for wpl 2023 has been launched vbm