आयपीएल २०१३ स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलामीस राजस्थान रॉयल्सशी गाठ पडणार आहे. हा सामना २१ सप्टेंबर रोजी जयपूर येथे होणार आहे.
या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका निश्चित करण्यात आली असून अंतिम सामना येथील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धेतील पात्रता फेरीचे सामने १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत हैदराबाद येथे आयोजित केले जातील.
पात्रता फेरीकरिता ओटॅगो वेल्स (न्यूझीलंड), सनरायझर्स हैदराबाद (भारत), श्रीलंका इलेव्हन (श्रीलंका) फैसलाबाद वुल्व्ज (पाकिस्तान) हे संघ पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीतून दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील.
संघांची गटवार विभागणी
अ गट- मुंबई इंडियन्स (भारत), हायवेल्ड लायन्स (द. आफ्रिका), पर्थ स्कॉटर्स (ऑस्ट्रेलिया), राजस्थान रॉयल्स (भारत) व पात्रता फेरीतील एक संघ
ब गट- चेन्नई सुपरकिंग्ज (भारत), टायटन्स (दक्षिण आफ्रिका), ब्रिस्बेन हीट (ऑस्ट्रेलिया), त्रिनिदाद व टोबॅगो (वेस्ट इंडिज), पात्रता फेरीतील एक संघ.

Story img Loader