आज हैदराबादमध्ये ‘आयपीएल’च्या १२व्या पर्वाचा विजेता ठरणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दीड महिन्यांच्या क्रिकेट मैदानावरील खमंग मनोरंजनानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अपेक्षेप्रमाणेच चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे ‘आयपीएल’च्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ रविवारी जेतेपदाचा सामना खेळणार आहेत. या वेळी चेन्नई एक्स्प्रेस मुंबई रोखणार का, हीच उत्सुकता क्रिकेटरसिकांना आहे.

चेन्नईत मंगळवारी झालेल्या ‘क्वालिफायर-१’ सामन्यासहित मुंबईने यंदाच्या हंगामात तीनदा चेन्नईला नामोहरम केले आहे. त्यामुळे मुंबईचे पारडे निर्विवादपणे जड मानले जात आहे. इतकेच नव्हे, तर उभय संघांमधील सामन्यांच्या विजयांची आकडेवारीसुद्धा मुंबईसाठी अनुकूल आहे. याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने चारपैकी तीन अंतिम फेरीचे सामने जिंकले आहेत. यापैकी दोन (२०१३ आणि २०१५) चेन्नईविरुद्ध जिंकले आहेत.

दोन वर्षांच्या बंदीनंतर गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदासह ‘आयपीएल’मध्ये शानदार पुनरागमन केले. यंदाच्या हंगामातही तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईची कामगिरी वर्चस्वपूर्ण आहे. त्यामुळे या सामन्यात कोणताही संघ जिंकला, तरी ‘आयपीएल’ इतिहासाचा एक अध्याय लिहिला जाणार आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, लोकेश राहुल आणि हार्दिक पंडय़ा या क्रिकेटपटूंना ‘आयपीएल’ने खंबीरपणे उभे केले. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या पंडय़ाकडून अंतिम फेरीतसुद्धा विजयवीराप्रमाणे खेळीची अपेक्षा आहे.

चेन्नईच्या शेन वॉटसनला ‘क्वालिफायर-२’ सामन्यात सूर गवसला असून, त्याने दिल्लीविरुद्ध ३२ चेंडूंत ५० धावांची अप्रतिम खेळी साकारली होती. याशिवाय फॅफ डय़ू प्लेसिस, अंबाती रायुडू आणि सामन्याचे चित्र पालटू शकणारा महेंद्रसिंह धोनी त्यांच्याकडे आहे.

चेन्नईकडे इम्रान ताहीर, हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा असा तिहेरी फिरकी मारा आहे. त्यांच्याशी सामना करण्याचे आव्हान मुंबईसमोर असेल. प्रतिस्पर्धी संघावर अंकुश ठेवणारा चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या खात्यावरसुद्धा १९ बळी जमा आहेत.

मुंबईकडे रोहित, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव असे दर्जेदार फलंदाज आहेत. याशिवाय हार्दिक आणि किरॉन पोलार्ड यांनी यंदाचा हंगाम गाजवला आहे. मुंबईकडे मिचेल मॅक्क्लिनॅघन, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक असा वेगवान मारा आहे. लेग-स्पिनर राहुल चहरने १२ सामन्यांत १२ बळी घेत आपली छाप पाडली आहे.

आमनेसामने

  • सामने : २९, मुंबईचे विजय १७, चेन्नईचे विजय १२
  • यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये झालेले तिन्ही सामने जिंकणाऱ्या मुंबईचे पारडे जड

संभाव्य संघ

  • मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), इशन किशन, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, मिचेल मॅक्क्लिनॅघन/ जयंत यादव, राहुल चहर, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमरा
  • चेन्नई सुपर किंग्ज : शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, ध्रुव शौरी/ मुरली विजय, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर.

कामगिरी

  • चेन्नई सुपर किंग्ज : विजेते २०१०, २०११, २०१८; उपविजेते २००८, २०१२, २०१३, २०१५
  • मुंबई इंडियन्स : विजेते २०१३, २०१५, २०१७; उपविजेते २०१०
  • स्थळ : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
  • सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, सिलेक्ट १, स्टार गोल्ड, स्टार प्रवाह.