मुंबई उपनगर हौशी वेटलिफ्टिंग संघटनेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुंबई पोलिसांनी वरिष्ठ गटात सांघिक जेतेपदावर नाव कोरले. नॅशनल हेल्थ जिमच्या प्रतीक कदमने वरिष्ठ गटात बेस्ट लिफ्टरचा मान पटकावला.
चैतन्य हेल्थ केअर सेंटरने कनिष्ठ गटाचे जेतेपद पटकावले. चैतन्य क्लबच्याच गौरव बनसोडे कनिष्ठ गटात बेस्ट लिफ्टर ठरला. दरेकर फिटनेस क्लब नवोदित विजेता संघ ठरला तर पमी जिमच्या अक्षय पांडेची याच गटाचा बेस्ट लिफ्टर म्हणून निवड झाली. मुंबई पोलिस संघाची कल्पना सावंत वरिष्ठ गटात बेस्ट लिफ्टर ठरली.
विविध वजनी गटांमधील प्रथम क्रमांकांचे मानकरी
नवोदित गट : अक्षय पांडे, सागर धुमाळ, सुशील राजबर, सिद्धार्थ सिंग, ओमप्रकाश राजबर, तेजस मराठे, सचिन कोकाटे.
कनिष्ठ गट : दीपेश बरुचा, गौरव बनसोडे, महेश खरटमोल, आदेश टाकळकर, सालोमान पाडाओहिल, संकेत चव्हाण, वैभव बुरांडे.
वरिष्ठ गट : प्रतीक कदम, अमित शिंदे, संजय गायकवाड, हरप्रीत सिंग, आशिष सुर्वे, मंगेश शिंदे, इंद्रजित सिंग, मनोज मोरे.
वरिष्ठ महिला गट : इंद्रजीत कौर, निशा साटम, कल्पना सावंत, प्रिती टेमगरे, सोनाली गीते, नेहा इराणी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा