सुभाष उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये मुंबई पोलीस जिमखाना, राजमाता जिजाऊ, आकांक्षा आणि शिवशक्ती या संघांनी तर पुरुष गटात उत्कर्ष, अंबिका, विजय नवनाथ या संघांनी विजयी घोडदौड कायम राखली आहे.
खार येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबई पोलिस जिमखाना संघाने चुरशीच्या लढतीत पुण्याच्या शिवमुद्रा संघाचे आव्हान २८-२२ असे परतवून लावले. पुण्याच्या राजमाता जिजाऊने पहिल्या सामन्यात रत्नागिरीच्या संघर्षला ४३-१७ असे तर उपनगरच्या संघर्षला २८-२० असे पराभूत केले. शिवशक्तीने अमरहिंद संघावर १७-१२ असा विजय मिळवला. पुण्याच्या आकांक्षा संघाने अमरहिंदला १३-१० असे हरवले.
पुरुषांच्या ब गटात शिवशंकरने विजय क्लबला २२-१५ असे पराभूत केले. उत्कर्षने बंडय़ा मारुतीचा १३-१२ असा पाडाव केला.
विजय नवनाथला संमिश्र यश मिळाले. पहिल्या सामन्यात त्यांनी पंचवटीवर ३९-२२ असा विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना गोल्फादेवीकडून २१-२४ असा तीन गुणांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा