Mumbai Ranji Team won Irani Cup 2024 : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने २७ वर्षांनी इराणी कप २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा रणजी करंडक विजेता मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळली गेली. दोन्ही संघांतील हा सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. पाचव्या दिवशी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्लाय तनुष कोटियनने शतकी खेळी साकारली. तत्पूर्वी पहिल्या डावात सर्फराझ खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने ५३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अभिमन्यू ईसवरनच्या १९१ धावांच्या खेळीनंतरही रेस्ट ऑफ इंडिया ४१६ धावाच करता आल्या. ज्यामुळे मुंबईला १२१ धावांची आघाडी मिळाली होती.

मुंबईने पंधराव्यांदा पटकावले इराणी चषकाचे जेतेपद –

१९९७ नंतर प्रथमच मुंबईने इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे. मुंबईने इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्याची ही १५ वी वेळ आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली. मुंबईने पहिल्या डावात ५३७ धावा केल्या होत्या, तर उ रेस्ट ऑफ इंडिया ४१६ धावा करण्यात यशस्वी ठरला. पहिल्या डावात सर्फराझशिवाय कर्णधार रहाणेने ९७ धावांची खेळी खेळली होती.

T20 World Cup INDW beat WIW by 20 Runs in Womens World Cup Warm Up Match
Women’s T20 World Cup: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची जोरदार तयारी, पहिल्या सराव सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनचा केला पराभव; जेमिमा-पूजाची चमकदार कामगिरी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
WTC Points Table Sri Lanka Beat New Zealand and Improve PCT on 3rd Spot
WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय
What is the Irani Cup competition in domestic cricket and what is its history
इराणी कप हे नाव स्पर्धेला कसं मिळालं? जाणून घ्या भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेचा संपूर्ण इतिहास
India Clinch Historic Gold at 45th Chess Olympiad 2024 as Arjun Erigasi and D Gukesh Wins Their Matches
Chess Olympiad 2024: भारताने ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक, चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशची चमकदार कामगिरी
jannik sinner defeats taylor fritz in straight sets to win us open 2024 men title
सिन्नेरला जेतेपद : पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय
Asian Champions Trophy 2024 IND vs JAP India Hocket Team beat Japan by 5 1 Score
Asian Champions trophy 2024: पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर भारताच्या हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरू, चीननंतर जपानचा ५-१ च्या फरकाने पराभव
DPL 2024 Final East Delhi Champion
DPL 2024 Final : ईस्ट दिल्ली रायडर्सने पटकावले पहिले जेतेपद, मयंक रावत ठरला विजयाचा शिल्पकार

अभिमन्यू ईसवरनची एकाकी झुंज –

कर्णधार ऋतुराज गायकवाड पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियासाठी काही खास कामगिरी करु शकला नाही आणि 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिमन्यू ईसवरनने १६ चौकार आणि १ षटकारासह १९१ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ९३ धावांची खेळी केली. इशान किशनला केवळ ३८ धावा करता आल्या. रेस्ट ऑफ इंडियाचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले. या कारणामुळे रेस्ट ऑफ इंडियाला केवळ ४१६ धावा करता आल्या. पहिल्या डावात १२१ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.

हेही वाचा – ‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’

मुंबईकडून पृथ्वी शॉने दुसऱ्या डावात ७६ धावा केल्या. तनुष कोटियनने दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने १५० चेंडूत ११४ धावा केल्या, ज्यात १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्याशिवाय मोहित अवस्थीने ५१ धावांचे योगदान दिले. मुंबईने ३२९ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. मुंबई संघाने तब्बल २७ वर्षांनंतर इराणी चषक जिंकला आहे. टीम इंडियातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने अगोदर रणजी चषक आणि आता इराणी चषक उंचावला आहे.