‘मुंबईच्या कुस्तीची कोंडी- क्रीडांगणाचे मॅट जागेअभावी शासनाकडेच खितपत पडून’ या मथळ्याचे वृत्त ‘दै. लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. पुरेशा जागेअभावी शासन मुंबई शहर तालीम संघाला मॅट देत नव्हते, पण ८ फेब्रुवारी २०१३ला हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर शासनाला अखेर जाग आली आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट तालीम संघाला दिले.
जुन्या, जीर्ण झालेल्या मॅटवर तालीम संघाला स्पर्धा खेळवाव्या लागत होत्या. शासनाने त्यांना मॅट मंजूर केली असली तरी मॅट ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी जागा नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आणि शासनाची मॅट त्यांना काही केल्या मिळत नव्हती. त्यानंतर ‘दै.लोकसत्ता’च्या वृत्ताची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आणि तालीम संघाला आंतराष्ट्रीय दर्जाची मॅट काही दिवसांपूर्वी देऊ केली.
‘‘आम्हाला ‘लोकसत्ता’मधील वृत्तामुळेच ही मॅट मिळाली आहे. त्यांनी कुस्तीसारख्या मैदानी आणि देशी खेळासाठी प्रयत्न केले, याबाबत आम्ही त्यांचे आभारी आहोत,’’ असे मुंबई शहर तालीम संघाचे सरचिटणीस प्रकाश तानावडे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा