Dhawal Kulkarni Retirement : रणजी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम फेरीत ४१ वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईने शानदार पुनरागमन केले आहे. विदर्भाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात पहिल्या डावात अवघ्या २२४ धावांत गुंडाळल्यानंतरही आघाडी घेण्यात यश आले. धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि तनुष कोटियन यांच्या दमदार गोलंदाजीमुळे विदर्भाचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांवर आटोपला. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी धवल कुलकर्णीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

या डावात मुंबईसाठी शानदार गोलंदाजी करणाऱ्या धवल कुलकर्णी फायनल सामना सुरु होण्यापूर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने आज शेअर केला आहे.

Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला ज्येष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाने रणजी फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध जबरदस्त पुनरागमन केले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाला फलंदाजीच्या खराब स्थितीमुळे केवळ २२४ धावाच करता आल्या. मात्र तळातील फळीतील फलंदाजी करणाऱ्या शार्दुल ठाकूरने अर्धशतक झळकावून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

हेही वाचा – Arun Dhumal : वर्षातून दोनवेळा ‘IPL’ होणार का? आयपीएलचे चेअरमन म्हणाले…

पहिल्या डावात मुंबईला २२४ धावांत गुंडाळल्यानंतर विदर्भाच्या आघाडीच्या आशा धवल कुलकर्णीने धुळीस मिळवल्या. अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने ११ षटकांत ५ निर्धाव षटके टाकली आणि अवघ्या १५ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने सलामीवीर अथर्व तायडे, अमन मोखाडे आणि गेल्या सामन्याचा नायक करुण नायर यांना बाद केले.

८ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत –

विदर्भाचा संघ मुंबईविरुद्ध पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला आणि संघाचे ८ फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. यापैकी दोनमोठ्या नावांना खातेही उघडता आले नाही. ज्यामध्ये करुण नायर आणि ध्रुव शौरी यांचा समावेश. करुणला धवल कुलकर्णीचा बळी बनवले तर ध्रुवची विकेट शार्दुल ठाकूरने घेतली.

धवल कुलकर्णीची कारकीर्द –

धवल कुलकर्णीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो गोलंदाजी करायला आला, तेव्हा मुंबईच्या खेळाडूंनी त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. यादरम्यान त्याने मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी हस्तांदोलन केले. रहाणेनेही शेवटच्या सामन्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. कुलकर्णीने १५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ९५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात २७.३१ च्या सरासरीने २८१ विकेट्स घेतल्या आहेत. कुलकर्णीने टीम इंडियासाठी १२ एकदिवसीय आणि २ टी-२०सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी अनुक्रमे १९ आणि ३ विकेट घेतल्या आहेत.