यजमान मुंबईला छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या सलामीच्या दिवशी शुक्रवारी संमिश्र यश मिळाले. मुंबईच्या १८ वर्षांखालील मुलांनी पुण्याला २५-२०, २५-२१, २५-१३ असे हरवले. मात्र कोल्हापूरने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबईचा २५-१२,२५-१५, २५-१४ असा फडशा पाडला. बलाढय़ कोल्हापूरने सर्वोत्तम कामगिरी करताना चारही विभागात थाटात सुरुवात केली. कोल्हापूरच्या २१वर्षांखालील मुलांनी नाशिकचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये २५-१८, २०-२५, २२-२५, २५-१५, १५-११ असा अखेर पराभव केला. कोल्हापूरच्या शिवकुमार पाटील आणि सुरज पवार यांनी अष्टपैलू खेळ केला. एका उत्कंठावर्धक सामन्यात नागपूर विभागाने १८ वर्षांखालील मुलांच्या गटात लातूरला २८-२६, २५-१३, २४-२६, २१-२५, १५-१३ असे नमवले.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत पहिल्याच दिवशी कोल्हापूरने १८ वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकचा २५-७,२५-१२,२५-१२ असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडविला. मुलींच्या १८ वर्षांखालील गटामध्ये नाशिकने पुण्याविरुद्ध ११-२५, २५-२३,२५-२२,२५-२० असा विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा