Mumbai Beats Vidarbha in Ranji Trophy Final 2024: मुंबईच्या संघाने विक्रमी ४२ व्यांदा रणजी करंडक आपल्या नावे केला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील संघाने या हंगामात अष्टपैलू कामगिरी करत अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. विदर्भच्या संघानेही कडवा प्रतिकार करत मुंबईला सहज विजय मिळवू दिला नाही. अक्षय वाडकर, करूण नायर आणि हर्ष दुबे यांनी मुंबईने दिलेले डोंगराएवढे लक्ष्य गाठण्याचा आठोकाठ प्रयत्न केला खरा पण मुंबईच्या शिलेदारांनीही काही शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि रणजी करंडकावर आपले नाव कोरले. धवल कुलकर्णीने त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात शेवटच्या षटक टाकत १०वी विकेट घेतली आणि मुंबईचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन संघ ठरला.

पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा डाव सुरू झाला तेव्हा विदर्भचा संघ ५ बाद २४८ धावांवर खेळत होता. त्यांना विजयासाठी २९० धावांची तर मुंबईला ५ विकेट्सची गरज होती. अक्षय वाडकर आणि हर्ष दुबेची जोडी मैदानात पाय रोवून उभी होती. वाडकरने रणजी फायनलमधील त्याचे दुसरे शतक पूर्ण केले होते.पण नंतर ९ चौकार आणि १ षटकार लगावत १०२ धावा करणाऱ्या शतकवीराला मुंबईच्या तनुष कोटीयनने शतकी खेळी केलेल्या अक्षय वाडकरला पायचीत करत विदर्भ संघाला मोठा धक्का दिला.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
loksatta lokankika Mumbai thane
महाविद्यालयांत तालमींचा कल्ला! ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी युवा रंगकर्मींचा कसून सराव
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण
Loksatta Lokankika Five ekankika  in Mumbai zonal finals Mumbai news
मुंबई विभागीय अंतिम फेरीत पाच एकांकिकांची धडक
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद

तनुषनंतर तुषार देशपांडेने दुबेला झेलबाद करत विदर्भाच्या आशांवर पाणी फेरले.त्यानंतर आदित्य सरवटेची विकेटही देशपांडेच्या नावे होती. तनुष कोटीयनने षटकार लगावणाऱ्या यश ठाकूरला क्लीन बोल्ड केले. नंतर अजिंक्यने शेवटच्या विकेटची जबाबदारी अनुभवी धवलवर सोपवली आणि त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने उमेश यादवला क्लीन बोल्ड करत सामना मुंबईच्या नावे केला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबई पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भ संघाचा डाव १०५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात मुंबईच्या मुशीर खानच्या शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या ९५ धावा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ७३ धावांच्या जोरावर सर्वबाद ४१८ धावांचा डोंगर उभारला आणि विदर्भासमोर ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात विदर्भकडून सलामीवीर अथर्व तायडे आणि ध्रुव शोरी यांनी त्यांना ६४ धावांची भागीदारी करून दमदार सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला पण शम्स मुलाणीने तायडेला बाद करून पहिली विकेट मिळवली. तनुष कोटियनने शोरीला बाद करत लगेचच दुसरी विकेट घेतली. अमन मोखाडे आणि यश राठोडला पायचीत करत त्यांना झटपट माघारी धाडले आणि पाहुण्या संघाने १३३ धावांवर ४ विकेट गमावले होते. करूण नायर चांगल्याच फॉर्मात दिसत होता, विस्फोटक खेळी करत त्याने ७४ धावा केल्या होत्या. पण चौथ्या दिवसाच्या अखेरीस गोलंदाजीला आलेल्या मुशीर खानने नायरला झेलबाद केले.

मुंबईने शेवटचं रणजी जेतेपद (२०१५-१६) मध्ये पटकावलं होतं. त्या सामन्यातील ३ खेळाडू या सामन्यातही आहेत. श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि धवल कुलकर्णी. या तिन्ही खेळाडूंनी अंतिम सामन्यात मोठी भूमिका बजावली. ८ वर्षांपूर्वीच्या त्या फायनल सामन्यात श्रेयसने शतक केलं होतं आणि या अंतिम सामन्यातही श्रेयसने ९५ धावांची खेळी केली. शार्दूल ठाकूरने सामन्याच्या पहिल्या डावात संघ बॅकफूटवर असताना ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाची धावसंख्या २०० पार नेली. अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीने अंतिम सामन्यात एकूण ४ विकेट्स घेतल्या. मुंबईने सांघिक प्रदर्शनाच्या बळावर जेतेपद पटकावलं आहे. या हंगामात कर्णधाराची कामगिरी सर्वसाधारण राहिली पण रहाणेने अंतिम सामन्यत ७४ धावांची खेळी केली.

मुंबई संघाचा स्टार खेळाडू तनुष कोटीयन याला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित केले आहे.तर युवा खेळाडू मुशीर खान याला अंतिम सामन्याचा ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले.

Story img Loader