‘दक्षिणात्य खेळाडूंचे कधीही कौतुक होऊ शकत नाही’ असे म्हणत मुरली विजयने संजय मांजरेकरांवर जोरदार हल्लाबोल केला. भारतीयांसाठी घरच्या कसोटीत ‘रूपांतरण’ यादीत पहिले स्थानासाठी संजय मांजरेकरांच्या प्रतिक्रियेवर मुरली विजयने ‘आश्चर्यजनक’ प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा माजी सलामीवीर मुरली विजय, ज्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, त्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपुरातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मुंबईचा माजी खेळाडू संजय मांजरेकर यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेचे समालोचक संजय मांजरेकरांनी मायदेशात कसोटी सामन्यांमध्ये भारतीय सलामीवीरांच्या रूपांतरण दराबाबत आकडेवारी मांडल्यानंतर आश्चर्यचकित झाल्याचे मान्य केले. मांजरेकर जे बोलले ते ऐकून विजयला आनंद झाला नाही. या यादीत विजय पहिल्या क्रमांकावर आहे तर मोहम्मद अझरुद्दीन, पॉली उमरीगर, रोहित शर्मा आणि विराट कोहली याच्या पाठोपाठ आहे. मांजरेकरांवर तोंडसुख घेत विजयने दोन ट्विट पोस्ट केले, ज्यात पहिले एक होते, “@sanjaymanjrekar आश्चर्यचकित व्वा”. दुसऱ्या ट्विटमध्ये तो म्हणाला, “मुंबईचे काही माजी खेळाडू दक्षिणेचे कधीही कौतुक करू शकत नाहीत!”

३०  जानेवारी २०२३ रोजी निवृत्त झालेल्या विजयने डिसेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत अखेरचे राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने भारतासाठी एकूण ६१ कसोटी, १७ एकदिवसीय सामने आणि नऊ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यापूर्वी, त्याच्या निवृत्ती नोटमध्ये, विजयने लिहिले होते: “आज, अपार कृतज्ञता आणि नम्रतेने, मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करतो. २००२ ते २०१८ हा माझा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भूत वर्षे आहे कारण तो खेळाच्या सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारा सन्मान होता.”

हेही वाचा: IND vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलिया जडेजाची विकेट ढापण्यात अपयशी! LBWच्या अपीलमध्ये बॅटच्या किनारा नव्हे तर ‘या’ कारणाने वाचवले

पुढे बोलताना तो म्हणाला होता की, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की मी क्रिकेटच्या जगामध्ये आणि त्याच्या व्यवसायाच्या बाजूने नवीन संधी शोधणार आहे, जिथे मी नवीन आणि वेगळ्या वातावरणात मला आवडणाऱ्या आणि आव्हान देणाऱ्या खेळात सहभागी होत राहीन. मला विश्वास आहे की एक क्रिकेटर म्हणून माझ्या प्रवासातील ही पुढची पायरी आहे आणि मी माझ्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची वाट पाहत आहे. मी माझ्या सर्व माजी सहकाऱ्यांना आणि भारतीय क्रिकेट संघाला भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murali vijay lashed out at sanjay manjrekar saying that a south indian players can never be appreciated avw