Murder case filed against Shakib Al Hasan : बांगलादेश क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन अडचणीत सापडला आहे. शकीब अल हसनवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी न्यूज वेबसाईट ढाका ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, मृत रुबेलचे वडील रफीकुल इस्लाम यांनी ढाका येथील अडबोर पोलीस स्टेशनमध्ये शकीबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुबेल हा कापड कामगार होता ज्याचा निदर्शनादरम्यान मृत्यू झाला.

हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप –

शकीब अल हसनशिवाय बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद याच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकीब हा या प्रकरणातील २८वा आरोपी आहे, तर फिरदौस हा ५५वा आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना, ओबेदुल कादर आणि अन्य १५४ जणांचा समावेश आहे. सुमारे ४००-५०० अज्ञात लोकांनाही आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांवर हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
First photo of saif ali khan attacker
PHOTO: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो आला समोर
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Worli accident case, Mihir Shah , High Court ,
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे

७ ऑगस्ट रोजी रुबेलचा मृत्यू –

५ ऑगस्ट रोजी, रुबेलने एडबोरमधील रिंग रोडवरील निषेध मोर्चात भाग घेतला होता. या मोर्चादरम्यान, सुनियोजित गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून कोणीतरी जमावावर कथित गोळीबार केला, परिणामी रुबेलच्या छातीत आणि पोटात गोळी लागली. यानंतर रुबेलला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Tim Southee : टिम साऊदीला धोनीचं आयुष्य जगायचंय, न्यूझीलंडच्या कर्णधाराने व्यक्त केल्या मनातील भावना; काय आहे नेमकं कारण?

शकीब अल हसन सध्या पाकिस्तान दौऱ्यावर –

या वर्षी जानेवारीमध्ये अवामी लीगच्या तिकिटावर शकीब अल हसन आणि फिरदौस अहमद खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, शेख हसीना सरकारची सत्तेतून हकालपट्टी केल्यामुळे या दोघांनाही खासदारकी गमवावे लागली. शकीब अल हसन सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे, जिथे बांगलादेश संघ यजमान देशाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.

हेही वाचा – Rohit Sharma : “मी ‘हे’ करत नाही पण संघातील खेळाडू…”, रोहित शर्माने सांगितलं ड्रेसिंग रुममधलं गुपित, बॅट निवडीवर म्हणाला…

शकीब अल हसन नेहमीच चर्चेत –

बांगलादेश क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन नेहमीच त्याच्या कृत्यांमुळे चर्चेत असतो. त्याने अनेकवेळा पंचांशी गैरवर्तन केले असून चाहत्यांशी हाणामारीही केली. यावर्षी एप्रिल महिन्यात त्याची ग्राउंड्समनशी बाचाबाची झाली होती. एवढेच नाही तर शकीबने ग्राउंड्समनचा फोन हिसकावण्याचाही प्रयत्न केला. तसेच कानशिलात लगावण्याची धमकीही दिली होती.

Story img Loader