टेनिसच्याचाहत्यांना खेळाचा निखळ आनंद मिळवून देणाऱ्या लढतीत अँडी मरे याने रॉजर फेडरर याचे आव्हान पाच सेट्सच्या रोमहर्षक लढतीनंतर परतविले आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. चार तासांच्या झुंजार खेळानंतर मरे याने हा सामना ६-४, ६-७ (५-७), ६-३, ६-७ (२-७), ६-२ असा जिंकला.
मरे याने गतवर्षी ऑलिम्पिक स्पर्धा व त्यापाठोपाठ अमेरिकन स्पर्धेत विजेतेपद मिळविताना अंतिम फेरीत फेडरर याच्यावरच मात केली होती. या लढतींची आठवण करून देताना मरे याने चिवट खेळ केला.
क्षणाक्षणाला रंगतदार झालेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी आपल्या चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडविला. मात्र शेवटच्या सेटमध्ये मरे याने फेडररची सव्‍‌र्हिस भेदून ३-० अशी आघाडी घेतली होती. तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. त्यानंतर पुन्हा आठव्या गेममध्ये मरे याने ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत फेडररची सव्‍‌र्हिस छेदली आणि विजयश्री संपादन केली.

Story img Loader