Musheer Khan break Sachin Tendulkar’s record 29 years ago : रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईचा फलंदाज मुशीर खानने मंगळवारी, १२ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर विदर्भाविरुद्ध २५५ चेंडूत शतक झळकावले. तो सचिन तेंडुलकरला मागे टाकत रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक झळकावणारा तो मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. सचिनने २९ वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती. आता मुशीरने सचिनचा विक्रम त्याच्यासमोर मोडला आहे. सर्फराझ खानच्या भावाने गेल्या तीन महिन्यात हे चौथे शतक झळकावले आहे.

पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईने दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरले. आघाडीची फळी ढासळल्यानंतर मुशीर आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने डावाची धुरा सांभाळली. मुंबईने पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. यानंतर रहाणे आणि मुशीर या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत कोणताही धक्का बसू दिला नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईने २ बाद १४१ धावा केल्या होत्या. दोघांनी आपापली अर्धशतके झळकावली होते.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

मुशीरची चमकदार कामगिरी –

तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीरने रहाणे ७३ धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरसह डावाचे नेतृत्व केले. मुंबईच्या डावाच्या ९०व्या षटकात मुशीरने तीन सामन्यांतील दुसरे प्रथम श्रेणी शतक पूर्ण केले. भारतीय फलंदाज सर्फराझ खानचा धाकटा भाऊ मुशीर याने बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आपल्या पहिल्या प्रथम श्रेणीतील शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर केले होते. वसीम जाफरनंतर ही कामगिरी करणारा तो मुंबईचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता.

हेही वाचा – IPL 2024 : ऋषभ पंत फिट असल्याची बीसीसीआयची घोषणा! दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार का?

सचिनचा विक्रम त्याच्यासमोरच मोडला –

१९ वर्षे आणि १४ दिवस वयाच्या मुशीरने रणजी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज म्हणून सचिनचा विक्रम मोडला. त्याच्या २२ व्या वाढदिवसाच्या एक महिना आधी, तेंडुलकरने १९९४-९५ हंगामाच्या अंतिम सामन्यात पंजाबविरुद्ध दुहेरी शतक झळकावले. त्याने आपल्या संघाला विजेतेपद दिले होते. योगायोगाने वानखेडेवर विदर्भ आणि मुंबई यांच्यातील अंतिम सामन्यात सचिन स्टँडवर उपस्थित होता.

मुशीर आणि श्रेयसची १६८ धावांची भागीदारी –

मुशीर खानने आपल्या झंझावाती खेळीसह श्रेयस अय्यरबरोबर १६८ धावांची भागीदारी केली. त्याने ३२६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १३६ धावांचे योगदान दिले. मात्र, श्रेयस अय्यरचे अवघ्या पाच धावांनी शतक हुकले. त्याने १११ चेंडूत १० चौकार ३ षटकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. सध्या मुंबई संघाची धावसंख्या ११० षटकानंतर ६ बाद ३५७ धावा असून त्यांच्याकडे ४७६ धावांची आघाडी आहे.