Musheer Khan Car Accident Health Update: मुंबईचा फलंदाज मुशीर खान शुक्रवारी दुपारी रस्ते अपघातात जखमी झाल्याने १६ आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. सर्फराज खानचा धाकटा भाऊ, लखनौ येथे होणाऱ्या आगामी इराणी चषक आणि रणजी ट्रॉफी २०२४-१५ हंगामाच्या सुरुवातीला सामन्यांचा भाग नसेल. इंडियन एक्सप्रेसकडून त्याच्या अपघात झालेल्या कारचे काही फोटो समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुशीर त्याचे वडील नौशाद खान आणि इतर दोघांसह शुक्रवारी दुपारी आझमगडहून पूर्वांचल एक्सप्रेसवे मार्गे लखनौला जात असताना त्यांची कार दुभाजकाला धडकली आणि उलटली. त्याच्या वडिलांना आणि इतर दोघांना किरकोळ ओरखडे पडले तर मुशीरच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला मानेच्या मागच्या बाजूलाही वेदना होत आहेत. पुढील उपचारासाठी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीने केली बुमराहची नक्कल, जडेजाने पण दिली साथ; हे पाहून जसप्रीत बुमराहने दिली अशी प्रतिक्रिया

मुशीर खानच्या कारचा अपघात हा दुभाजकाला धडकून झाला आणि त्यानंतर कार पलटली. मुशीरच्या या अपघातावरून ऋषभ पंतच्या अपघाताची आठवण झाली. ऋषभ पंतची कार देखील अशाच प्रकारे दुभाजकाला धडकून पलटली होती. ज्यात पंतला गंभीर दुखापत झाली होती.

मुशीर खानच्या अपघाताबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, १९ वर्षीय टॉप-ऑर्डर फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मुशीर खान याचा शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी, आगामी इराणी कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याच्या कुटुंबासह आझमगढवरून लखनौला जात असताना अपघात झाला.

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

मुशीर खानच्या दुखापतीबद्दल अधिकृत माहिती समोर

मुशीरला सध्या लखनौ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तो स्थिर आणि सुस्थितीत आहे. त्याला मानेच्या भागात फ्रॅक्चर झाले आहे आणि तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) वैद्यकीय संघ त्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत जेणेकरून त्याला शक्य तितकी सर्वोत्तम सुविधा मिळेल.

एकदा मुशीर वैद्यकीयदृष्ट्या प्रवासासाठी फिट असल्याचे समजल्यानंतर, त्याला पुढील अतिरिक्त वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला नेले जाईल. यानंतरच त्याच्या पुनरागमनाला किती वेळ लागेल याबाबत निश्चित माहिती दिली जाईल.

“काल रात्री त्याचा अपघात झाला असून तो इराणी चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. रविवारी तो मुंबईत परतणार आहे. एमसीए आणि बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. तो मुंबईत परतल्यावर, बीसीसीआय एक वैद्यकीय तपासणी आणि स्कॅनची दुसरी फेरी घेईल,” असे एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले होते.

हेही वाचा – Musheer Khan: सर्फराज खानचा भाऊ मुशीर खान रस्ते अपघातात जखमी, फ्रॅक्चर झाल्याने इराणी लढतीस मुकण्याची शक्यता

मुशीर खान आणि नौशाद खान यांच्या कारचा अपघात (फोटो-इंडियन एक्सप्रेस)

मुंबई संघाबरोबर लखनौला गेला नाही मुशीर कारण…

इराणी चषकात सहभागी होण्यासाठी मुंबईचा संघ शुक्रवारी संध्याकाळी लखनौला रवाना झाला. मुशीरला त्याच्या गावी जाऊन मग लखनौला यायचे होते, जिथे त्याने प्रशिक्षण घेतले. मुशीरने संघाबरोबर जावे अशी एमसीएची इच्छा होती. पण त्याचे वडील नौशाद यांनी आपल्या मुलाला आझमगडमध्ये प्रशिक्षण देण्याची विनंती केली होती, कारण त्यांच्या मुलाने दुलीप ट्रॉफीच्या अखेरच्या पाच डावांमध्ये जास्त धावा केल्या नाहीत. मुंबई संघाच्या प्रशिक्षक व्यवस्थापनाशी सल्लामसलत केल्यानंतर एमसीएने नौशाद यांची विनंती मान्य केली. मुंबई संघाने मुंबईत दोन दिवसांच्या नेट सरावाचे नियोजन केले होते, मात्र पावसामुळे सराव सत्र होऊ शकले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musheer khan road accident health update his car overturned after hitting divider like rishabh pant accident bdg