अनुस्तुप मुजुमदार, सुदीप चॅटर्जी आणि वृद्धिमान साहा यांच्या दमदार खेळींच्या जोरावर रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बंगालने पहिल्या डावात सौराष्ट्रला चोख प्रत्युत्तर दिले. अर्पित वास्वडाचे शतक (१०६) आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकामुळे (६६) यजमान सौराष्ट्राने बंगालविरुद्ध पहिल्या डावात सर्वबाद ४२५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात ५ बाद २०६ या स्थितीतून पुजारा आणि वास्वडा जोडीने सौराष्ट्राला सावरले. त्यानंतर बंगालनेही आपल्या फलंदाजीच्या वेळी दमदार कामगिरी केली.

#CoronaVirus : IPL 2020 राहणार टीव्हीपुरतं मर्यादित?

या सामन्यात सौराष्टच्या फलंदाजीच्या वेळी एक धमाल घडली. वेगवान गोलंदाजाने फलंदाजाचा त्रिफळा तर उडवलाच पण त्यासह त्याने एक यष्टीदेखील मोडून टाकली. ८ बाद ३८७ या धावसंख्येवर सौराष्ट्रचा संघ खेळत होता. सी जानी हा फलंदाज आकाशदीपच्या गोलंदाजीचा सामना करत होता. त्यावेळी आकाश दीपने टाकलेला चेंडू अपेक्षेपेक्षा खूपच कमी उडाला आणि त्यामुळे जानी त्रिफळाचीत झाला. मजेदार गोष्ट म्हणजे चेंडू स्टंपला लागल्यामुळे चक्क स्टंपदेखील तुटला. हा प्रकार खुद्द फलंदाज जानीदेखील अवाक झाल्याचे दिसले.

IPL 2020 : उच्च न्यायालयाचा BCCI ला दणका

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी पुजारा तापामुळे निवृत्त झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आल्यावर त्याने २३७ चेंडूंना सामोरे जात डाव सावरला. वास्वडानेही शतकी खेळी करत पुजारासोबत १४२ धावांची भागीदारी केली. त्याचे हे प्रथम श्रेणीतील आठवे शतक ठरले. वास्वडाचे शतक आणि पुजारासह अवि बारोट, विश्वराज जाडेजा यांची अर्धशतके यांच्या बळावर सौराष्ट्रने पहिल्या डावात ४०० पार मजल मारली.

IND vs SA : पाऊस जिंकला, पहिला सामना रद्द

त्यानंतर बंगालने सामन्यातील पहिल्या डावात धडाकेबाज खेळी केली. सुदीप चॅटर्जीने अप्रतिम खेळ करत गोलंदाजांचा समाचार घेतला, पण शतकाने त्याला हुलकावणी दिली. ८१ धावांवर तो बाद झाला. अनुभवी वृद्धिमान साहानेदेखील अर्धशतक ठोकले. त्याने ६४ धावा केल्या. तसेच अनुस्तुप मुजुमदारनेही दमदार खेळ केला.

Story img Loader