Muttiah Muralitharan on Rahul Dravid: आशिया चषक २०२३ दरम्यान श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला त्याच्या फलंदाजीवरून उपरोधिकपणे बोलत टोमणा मारला आहे. श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन म्हणतो की, “सध्याचे भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड हे महान फलंदाजांच्या यादीत समाविष्ट आहेत ज्यांना माझा चेंडू स्टंपकडे जाताना वाचण्याचा मार्ग सापडत नाही. माझ्या गोलंदाजीवर ते नेहमी अडचणीत येत असत.” मुरलीधरनने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांसारखे भारतातील अनेक महान फलंदाज माझ्यासमोर चेंडू वाचवू शकतात परंतु द्रविड तसे करू शकला नाही.”

मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर आधारित ‘८००’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी मुरलीधरन म्हणाला, “सचिन तेंडुलकर माझे चेंडू खूप चांगला खेळायचा, पण बरेच दिग्गज खेळाडू त्याच्या सारखे खेळू शकले नाहीत. ब्रायन लाराही यात यशस्वी ठरला, पण तोही माझ्या चेंडूंवर मोठे फटके मारताना अडचणीत येत असे. राहुल द्रविड हा महान फलंदाज आहे पण माझा चेंडू खेळताना तो अडखळत असे.” दिग्गज क्रिकेटपटू तेंडुलकरही यावेळी उपस्थित होता.

Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Dodda Ganesh has been sacked as the coach of the Kenya men's national team
माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका
Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket
IND vs BAN : गिल-जैस्वाल नव्हे तर ‘हा’ २६ वर्षीय खेळाडू भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज, सौरव गांगुलीचा दावा
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Danish Kaneria Statement on Gautam Gambhir about Pakistan Cricket
‘पाकिस्तानला गौतम गंभीरसारख्या कणखर प्रशिक्षकाची गरज…’, दानिश कनेरियाचे वक्तव्य; म्हणाला, तो मागे न बोलता समोरच…
Mark Wood out for the year with an elbow injury
ENG vs SL : इंग्लंड संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मार्क वुड यंदा क्रिकेट खेळणार नाही; नेमकं काय आहे कारण?
Rahul Dravid son Samit Dravid India U19 call up
Samit Dravid : राहुल द्रविडचा मुलगा समित भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड होऊनही विश्वचषकात का खेळू शकणार नाही? जाणून घ्या

फिरकीपटूसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण करून देताना तेंडुलकर म्हणाला, “मी त्याला १९९२-९३ मध्ये जेव्हा पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हापासून आम्ही चांगले मित्र आहोत. तो चेंडू कसा फिरवायचा हे साऱ्या जगाला माहीत होते. ‘एक्स्प्रेस वे’वरही जर त्याने तुम्हाला गोलंदाजी केली तर तो तिथेही चेंडू फिरवेल. खेळपट्टी (पृष्ठभाग) काहीही असो. जेव्हा त्याने ‘दूसरा’ बॉल टाकायला सुरुवात केली तेव्हा त्याने १८ महिने नेटमध्ये खूप सराव केला.”

हेही वाचा: राहुल, सूर्यकुमारला विश्वचषकाचे तिकीट! भारताचा १५ सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर; तिलक, प्रसिधला वगळले

मास्टर ब्लास्टर सचिन पुढे म्हणाला, “गेल्या महिन्यातच मी काही कामासाठी श्रीलंकेला गेलो होतो आणि त्यावेळी मुरलीधरनला मेसेज केला की मी तुमच्या शहरात आलो आहे. त्यावर तो म्हणाला, ‘मी भारतात असल्याचे त्याने सांगितले.’ त्यानंतर जेव्हा पहिल्यांदाच त्याने मला त्याच्या बायोपिक चित्रपटाबद्दल सांगितले आणि विचारले की तू माझ्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला येशील का? तेव्हा मी त्याला म्हणालो, तुझ्यासाठी केव्हाही येईन. आज मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. आम्हा सर्वांना आशा आहे की हा चित्रपट सर्वांना आवडेल. या चित्रपटासाठी मी मुथय्या मुरलीधरन आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो.”

‘स्लमडॉग मिलेनियर’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलेला अभिनेता मधुर मित्तल ‘८००’ चित्रपटात मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मधुर मित्तल व्यतिरिक्त महिमा नांबियार, नरेन, नस्सर, वेला राममूर्ती, रित्विक, अरुल दास आणि हरी कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा: अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : महिला गटात नामांकितांना धक्के

५१ वर्षीय श्रीलंकेचा माजी खेळाडू मुरलीधरनच्या नावावर १३३ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. २०१० मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मुरलीधरनने ३५० एकदिवसीय सामन्यात ५३४ आणि १२ टी२० सामन्यात १३ विकेट्स घेतले आहेत.