श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुरलीधरन म्हणाला, ”माझ्या कारकीर्दीत मी सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करण्यास कधीही घाबरत नव्हतो, परंतु वीरेंद्र सेहवागला जास्त घाबरत होतो, कारण तो कधीही फटकेबाजी करू शकत होता.” ईएसपीएन क्रिकइन्फोवर आकाश चोप्रासोबत झालेल्या संभाषणात मुरलीधरनने आपले मत व्यक्त केले.

मुरलीधरन म्हणाला, “सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायला मी घाबरत नव्हतो, कारण त्याने माझे नुकसान केले नाही. दुसरीकडे, वीरेंद्र सेहवाग खूप धोकादायक खेळाडू होता. जेव्हा तो फलंदाजीला यायचा, तेव्हा आम्ही क्षेत्ररक्षक दूर ठेवायचो. कारण आम्हाला माहीत होते, की तो निश्चितपणे फटकेबाजी करणार आहे. सेहवागला माहीत होते, की जर त्याचा दिवस असेल तर तो जगातील कोणत्याही गोलंदाजावर हल्ला चढवूू शकतो.”

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Yograj Singh on Yuvraj Singh cancer 2011 world cup
Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”

मुरलीधरनने सचिनच्या कमकुवत बाजूचाही खुलासा केला. तो म्हणाला, ”मला माझ्या कारकिर्दीत नेहमीच असे वाटत आले आहे, की सचिन तेंडुलकरला ऑफ स्पिन विरुद्ध थोडी अडचण होती. तो लेग स्पिनविरुद्ध खूप धावा करायचा, पण त्याला ऑफ स्पिनवर त्रास व्हायचा आणि मी त्याला ऑफ स्पिन खेळवताना अनेक वेळा बाद केले आहे.”

हेही वाचा – गांजा घेतला अन् संस्पेड झाला; कमबॅक केलं, तेव्हा जग पाहतच बसलं!

याआधी मुरलीधरनने २०११च्या वर्ल्डकप फायनलमध्ये महेंद्रसिंह धोनी पाचव्या क्रमांकावर का खेळला, याचे कारणही स्पष्ट केले. मुरलीधरन म्हणाला, ”धोनीने माझ्या गोलंदाजीचे आकलन केले होते. म्हणूनच तो अंतिम सामन्यात पाचव्या क्रमांकावर आला. जेव्हा मी चेन्नई सुपर किंग्जमध्ये होतो, तेव्हा शेवटी त्याला माझी गोलंदाजी कळली होती. युवराजला वर्ल्डकपमध्ये माझ्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तो येणार होता, पण मला वाटते की धोनी माझ्यामुळे त्याच्याआधी आला.”

विक्रमवीर मुरलीधरन

कसोटी आणि एकदिवसीय दोन्हीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने वनडे क्रिकेटमध्ये ५३४ विकेट्सही घेतल्या आहेत.

Story img Loader