Ranji Trophy 2024: अनुभवी कसोटी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य ठेवताना आपल्या कारकिर्दीत १०० कसोटी सामने खेळल्याबद्दल सांगितले आहे. उजव्या हाताचा फलंदाज रहाणे जो आता भारतीय निवडकर्त्यांच्या यादीत नाही आणि रणजीमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. गतवर्षी रहाणेने चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रहाणे म्हणाला की, “मला भारतासाठी १०० कसोटी सामने खेळायचे आहेत आणि मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी मार्गदर्शन करणे हे माझे पहिले लक्ष्य आहे.” मुंबईने आंध्रचा १० गडी राखून पराभव केल्यानंतर त्याचे हे वक्तव्य आले आहे. रहाणे पुढे म्हणाला, “मला मुंबईसाठी एकाच वेळी चांगली कामगिरी करायची आहे. रणजी करंडक जिंकण्याचे उद्दिष्ट असून १०० कसोटी सामने खेळण्याचे मोठे उद्दिष्ट आहे.” रहाणेने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला होता, जिथे त्याने ३६ चेंडूत ८ धावा केल्या होत्या. ३५ वर्षीय रहाणेने २०१३ मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले होते, तेव्हापासून तो ८५ कसोटी सामने खेळला आहे. सध्या टीम इंडिया युवा खेळाडूंना कसोटीत अधिक संधी देत आहे, अशा परिस्थितीत ३५ वर्षांच्या रहाणेसाठी १०० कसोटी खेळण्याचा मार्ग सोपा नसेल.

आंध्रविरुद्ध खाते उघडण्यात आले अपयश

मोसमातील पहिल्या सामन्यात आंध्रविरुद्ध त्याला खाते उघडता आले नाही, तो शून्यावर बाद झाला. यानंतरही रहाणेच्या त्याच्या नेतृत्वात चौथ्या दिवशी सकाळी संघाला विजय मिळवून दिला. मात्र, यशाचा मार्ग आव्हानांनी भरलेला होता. त्याने आंध्रप्रदेशला फॉलोऑन दिला. त्यामुळे गोलंदाजांना विकेट्स काढण्याची आणखी एक संधी मिळाली. दुसऱ्या डावात आंध्रप्रदेशने शानदार फलंदाजी केली मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. मुंबईला पुन्हा ३४ धावा करण्यासाठी मैदानात यावे लागले होते.

हेही वाचा: IND vs ENG: कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लंडचा बेन डकेत घाबरला, म्हणाला- “अश्विन मला पुन्हा बाद…”

आंध्रला पुन्हा एकदा फलंदाजी देण्याच्या आव्हानाबद्दल रहाणे म्हणाला, “हा निर्णय सहजच होता कारण, अशा संधी फार कमी वेळा येतात. जर तुम्ही परिस्थिती पाहिली आणि मागील आकडे बघितले तर ते तुमच्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरेल. आगामी सामन्यांमध्ये खेळपट्टी कशी असेल, परिस्थिती कशी असेल, संघ कसे फॉर्ममध्ये असतील हे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला कधीच कळत नाही की काय होणार आहे. त्यामुळे मला काल वाटले की जर गोलंदाजांनी स्वतःला थोडेसे आणखी सजग ठेवले आणि दोन-तीन लवकर विकेट्स घेतल्या तर आम्हाला जिंकणे सोपे होईल.”

हेही वाचा: BCCI new Selectors: अजित आगरकरला निवड समितीत मिळणार नवा जोडीदार! सिलेक्टर पदासाठी मागवले अर्ज

मुंबईचे दोन मोठे विजय

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत मुंबईने पाच विकेट्स घेतल्या आणि चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात १० गडी राखून सामना जिंकला. रणजी इतिहासातील सर्वात यशस्वी संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी संघाने विराटविरुद्ध डावाने विजय मिळवला होता. मुंबईने पहिल्या डावात ३९५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आंध्र प्रदेश केवळ १८४ धावांत गारद झाला. मुंबईने त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात त्यांनी थोडी चांगली झुंज दिली आणि २४४ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला ३४ धावांचे लक्ष्य विजयासाठी मिळाले. त्यांनी हा सामना १० विकेट्सने जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My goal is to win ranji trophy and play 100 test matches for india ajinkya rahane avw