N Jagadeesan smashed 6 fours off 6 balls against Rajasthan in Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामिळनाडूचा सलामीवीर एन. जगदीशनने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. या खेळाडूने स्फोटक फलंदाजी करत विरोधी संघातच्या एका गोलंदाजाला चांगलाच घाम फोडला. त्याने राजस्थानच्या अमन शेखावतच्या एकाच षटकात सलग ६ चौकार मारत त्याला दिवसा चांदण्या दाखवल्या. जगदीशनने शेखावतच्या षटकात एकूण ७ चौकार मारत २९ धावा कुटल्या. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एन. जगदीशनचा कहर –
उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज अमन शेखावत डावातील दुसरे षटक टाकायला आला होता. त्याचा पहिलाच चेंडू वाईड होता, जो यष्टीरक्षकाच्या मागून सीमारेषेच्या बाहेर गेला. यानंतर अमन शेखावतने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. अमन शेखावतने सतत शॉर्ट बॉल टाकले आणि जगदीशनने ऑफ साइडच्या बाहेर कट आणि ऑन साइड पुल शॉट खेळून सलग ६ चौकार मारले. अशा प्रकारे अमनच्या प्रत्येक चेंडूवर तामिळनाडूला चौकार मिळाला. अमन शेखावत हा युवा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत फक्त ४ लिस्ट ए सामने खेळले आहेत.
एकाच षटकात मारले सलग ६ षटकार –
े
जगदीशनच्या आधी वरुण चक्रवर्तीनेही तामिळनाडूसाठी चांगली कामगिरी केली होती. या उजव्या हाताच्या मिस्ट्री स्पिनरने ५२ धावांत पाच विकेट्स घेतल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये चक्रवर्तीने चौथ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या कामगिरीच्या जोरावर चक्रवर्तीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला दावा पक्का केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानसाठी सलामीवीर अभिजीत तोमरने चमकदार कामगिरी केली. या खेळाडूने १११ धावांची शतकी खेळी खेळली. कर्णधार महिपाल लोमरोरनेही शानदार ६० धावांचे योगदान दिले. मात्र, या दोन्ही फलंदाजांशिवाय राजस्थानच्या इतर फलंदाजांना काही विशेष करता आले नाही. त्यामुळे संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली नाही. ज्यामुळे राजस्थानचा संघ २६७ धावांवरच मर्यादित राहिला.