आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) २७ जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा एन. श्रीनिवासन यांचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या श्रीनिवासन यांच्याविरोधात बिहार क्रिकेट असोसिएशनने (कॅब) दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याआधी आपल्या आदेशत याबाबत स्पष्टीकरण केले आणि त्यामुळेच सदर याचिकेवर आम्ही सुनावणी करणार नाही, असे न्यायमूर्ती जे. एस. केहर आणि सी. नागप्पन यांच्या खंडीपीठाने म्हटले आहे.

Story img Loader