बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवास यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात ते पदभार स्वीकारणार आहेत.
दुबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत भारतीय मंडळाच्या मागणीस मंजुरी देण्यात आली. त्यानुसार भारतीय मंडळ २०१५ ते २०२३ दरम्यान कोणाविरुद्ध मालिका खेळायची याचा निर्णय घेणार आहे. यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळणार आहे. तसेच, इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलियासही लक्षणीय कमाई होईल, मात्र, उर्वरित मंडळांना कसोटी क्रिकेट फंडमधून उत्पन्न देण्यात येईल. या प्रस्तावासाठी भारताने वेस्ट इंडीज, न्यूझीलंड व बांगलादेशचा यापूर्वीच पाठिंबा मिळविला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा