भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद भूषवण्यापासून एन. श्रीनिवासन यांना भलेही दूर राखण्यात आले असले तरी बार्बाडोस येथे येत्या आठवडय़ात सुरू होणाऱ्या आयसीसी मंडळाच्या बैठकीत श्रीनिवासन जगमोहन दालमिया यांच्याऐवजी प्रतिनिधित्व करणार आहेत.
आयसीसी मंडळाच्या २४ ते २६ जून या कालावधीत होणाऱ्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून आयसीसीचे कार्याध्यक्ष श्रीनिवासन उपस्थित राहणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. श्रीनिवासन यांच्याच अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.

Story img Loader