एन. श्रीनिवासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदावर कार्यरत राहतील, असे मत सचिव अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. नियमानुसार आयसीसीच्या कार्याध्यक्षपदावर जुलै २०१४ ते जून २०१६ पर्यंत दोन वष्रे बीसीसीआयचा प्रतिनिधी कार्यरत असेल.
‘‘बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून श्रीनिवासन सप्टेंबर २०१५पर्यंत आयसीसीच्या कार्याध्यक्षपदावर असतील. नियोजित कार्यक्रमानुसार सप्टेंबरमध्ये आमची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या वेळी याबाबत चर्चा होईल,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.
२०१४मध्ये श्रीनिवासन यांची आयसीसीच्या कार्याध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती. परंतु ताज्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर आता वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन यांनी कार्याध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करावा की नवा प्रतिनिधी पाठवण्यात यावा, याबाबत निर्णय होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा