जेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत चानेले शीपर्सवर दमदार विजय मिळवत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. सर्बियाच्या अॅना इव्हानोव्हिकने चीनच्या जी झेंगवर मात केली. पुरुषांमध्ये जेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या राफेल नदालने ल्युकास रोसोलला ४-६, ७-६, ६-४, ६-४ असे नमवत तिसरी फेरी गाठली. गेल्यावर्षी रोसोलनेच नदालचे आव्हान झटपट संपुष्टात आणले होते.
नोव्हाक जोकोव्हिचने ३५ वर्षीय राडेक स्टेपानेकला ६-४, ६-३, ६-७ (५-७), ७-६ (७-५) असे नमवले. स्टेपानेकविरुद्धच्या स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने तैपेईच्या येन स्युन ल्यूवर ७-६, ६-३, ३-६, ७-५ अशी मात केली. सेरेनाने शीपर्सवर ६-१, ६-१ असा सहज विजय मिळवला. अॅना इव्हानोव्हिकने जी झेंगवर ६-४, ६-० अशी मात केली. भारताच्या रोहन बोपण्णाने पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशीच्या साथीने खेळताना फ्रँन्स्टिक करमाक आणि मिखाइल एल्गिन जोडीवर ७-६(११-९), ७-६ (१०-८), ६-३ अशी मात केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा