तीन वर्षांच्या कालावधीनंतर रॉजर फेडररने राफेल नदालला नमवत बेसेल इन्डोअर टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. स्वित्र्झलडच्या ३४ वर्षीय फेडररने नदालवर ६-३, ५-७, ६-३ असा विजय मिळवला. बेसेल स्पर्धेचे फेडररचे हे सातवे तर यंदाच्या हंगामातील सहावे जेतेपद आहे. तसेच हे त्याच्या खात्यावरील ८८वे विजेतेपद ठरले.

Story img Loader