भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी२० सामना शुक्रवारी (२३ सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड, नागपूर येथे खेळला जाणार असून या सामन्यातील खेळपट्टी नेहमीच गोलंदाजांना मदत करते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे आजचा सामना ऑस्ट्रेलिया जिंकल्यास ते मालिका जिंकतील तर भारत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न नक्कीच करेल. दरम्यान अशामध्ये आजचा सामना होणाऱ्या मैदानातील खेळपट्टी कशी असेल? याबाबत जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विदर्भ क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी नेहमीच गोलंदाजांना साथ देणारी ठरली आहे. इतर स्टेडियममधील मैदानाची लांबी पाहता हे मैदान सर्व बाजूने खूप मोठे आहे. त्यामुळे या मैदानावर मोठी धावसंख्या फार कमीच होते. १७० ते १९०च्या दरम्यान धावा जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केल्या तर त्या धावांचा पाठलाग करणं दुसऱ्या संघाला अवघड जाणार हे निश्चित आहे. खरंतर १६० धावा या मैदानाची सरासरी धावसंख्या आहे पण रात्री दवाचा अडसर आणि भारतीय गोलंदाजी पाहता १६० पेक्षा १० ते २० धावा अधिक हाताशी असणं कधीही फायद्याच असेल.

हेही वाचा : India and Australia 2nd T20: नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यावर पावसाचे सावट  

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मैदानावर नोव्हेंबर २०१९मध्ये झालेल्या लढतीत भारताने बांगलादेशचा २९ धावांनी पराभव केला होता. या मैदानावर झालेल्या १२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांपैकी ९ सामने फलंदाजी प्रथम करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. मोहालीच्या तुलनेत ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पूरक आहे.

संभाव्य संघ

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया

ऍरॉन फिंच (कर्णधार), शॉन अबॉट, ऍश्टन ऍगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅशन इलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ऍडम झम्पा.  