Najam Sethi out of next PCB chairman race: आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी ट्वीट करून पाकिस्तान क्रिकेटच्या अडचणी वाढवल्या आहेत. खरे तर नजम सेठी यांनी पीसीबीच्या पुढील अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले आहे. अशा परिस्थितीत ते आता सहा महिन्यांत या पदावरून पायउतार होणार आहेत. नजम सेठी यांनी रमीझ राजा यांच्या जागी पीसीबीचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

नजम सेठी यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अध्यक्षपदावरून माघार घेतली आहे. नजम सेठी एका अंतरिम व्यवस्थापन समितीचे प्रमुख होते, जे गेल्या डिसेंबरपासून प्रशासन चालवत होते, ज्याचा कार्यकाळ २१ जून रोजी संपणार होता. सेठी यांनी यापूर्वीच बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. नजम सेठी यांनीही ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी पाकिस्तानातील राजकारण कारणीभूत आहे असे म्हटले आणि हात जोडले.

Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

पेशाने पत्रकार असलेले नजम सेठी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “मला आसिफ झरदारी आणि शाहबाज शरीफ यांच्यात वाद निर्माण करायचा नाही, अशा प्रकारची अस्थिरता आणि अनिश्चितता पीसीबीसाठी चांगली नाही. या परिस्थितीत मी पीसीबी अध्यक्षपदाचा उमेदवार नाही. सर्व संबंधित उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा.”

पीसीबीचा पुढील अध्यक्ष कोण होणार?

‘क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, काही काळापूर्वी अंतरिम व्यवस्थापन समिती संपल्यानंतर सेठी यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होईल, असे वाटत होते, परंतु गेल्या काही आठवड्यांपासून झका अश्रफ यांच्या पुनरागमनाची अटकळ जोर धरू लागली होती. बोर्डाचे माजी अध्यक्ष अश्रफ यांचे पुनरागमन अद्याप अधिकृत नसले तरी सेठी यापुढे या पदावर राहणार नाहीत.

PCB चेअरमन पदासाठी होणार घोडेबाजार!

सेठी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी पीसीबीच्या चेअरमनपदासाठी घोडेबाजाराचा उल्लेख केला आहे. शाहबाज शरीफ हे सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान असून पीसीबीवर पूर्णपणे त्याचे वर्चस्व आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) सध्याच्या सरकारमध्ये आघाडीचा प्रमुख भागीदार आहे. या पदासाठी अश्रफ हे त्यांच्या पक्षाशी संबंधित व्यक्ती मानले जात आहेत.

हेही वाचा: World Cup 2023: “पाकिस्तानच्या आडमुठेपणामुळेच…”, वर्ल्डकपच्या वेळपत्रकावरून BCCIने PCBला चांगलेच खडसावले

पाकिस्तानमध्ये पीसीबीच्या अध्यक्षाची निवड अशा प्रकारे होते

सामान्यतः पाकिस्तानी क्रिकेटमध्ये, पंतप्रधान पीसीबी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची निवड करतात, जे नंतर बोर्डाचे अध्यक्ष बनतात. पीसीबीचे अध्यक्ष शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) पक्षाने जरी निवड केली असली तरी पीपीपीने गेल्या काही आठवड्यांपासून आग्रह धरला आहे की ते पाकिस्तानच्या खेळाचे प्रभारी आहेत आणि त्यांना ते पद हवं आहे. अशा परिस्थितीत, इंटर-प्रोव्हिजनल कॉर्डिनेशन (IPC) ला आपल्या पसंतीच्या उमेदवाराला नामनिर्देशित करण्याचा अधिकार असेल.

सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचेही नाव यादीत आहे

क्रिकइन्फोच्या मते, आतापर्यंत पंतप्रधानांनी पीसीबी अध्यक्षपदासाठी दोन नावे दिलेली नाहीत. अशा परिस्थितीत अश्रफ यांच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे वकील मुस्तफा रमादे यांचाही या यादीत समावेश असल्याचे मानले जात आहे. या दोन्ही लोकांचा पीसीबीच्या १० सदस्यीय बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये समावेश आहे. असे मानले जाते की हे दोन्ही लोक पंतप्रधानांनी निवडलेल्या पीसीबी अध्यक्षपदासाठी थेट नामांकित आहेत, अशा परिस्थितीत जो कोणी अध्यक्ष होईल तो तीन वर्षांसाठी हे पद सांभाळेल. अश्रफ निवडून येण्यासाठी फेव्हरेट आहेत. मात्र, पीसीबी निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता असते.

हेही वाचा: ENG vs AUS: “आधी असे कसोटी सामने पाहिले नव्हते पण…”, माजी कर्णधार पाँटिंगचे बेन स्टोक्सच्या कॅप्टन्सीवर सूचक विधान

झका अश्रफ नऊ वर्षांनी पीसीबीमध्ये पुनरागमन करू शकतात. नजम सेठी आणि अश्रफ यांच्यात २०१३ ते २०१४ दरम्यान कायदेशीर लढाई झाली होती. जे नंतर शाहबाज यांचे मोठे बंधू माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संपवला. मग नवाजने अशरफला हटवून सेठीला परत आणले, त्यानंतर दोघांमध्ये वाद मिटला. रमीझ राजा यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर सेठी गेल्या वर्षी बोर्डात परतले. त्यानंतर २०१९ मध्ये मंडळाची घटनाही रद्द करण्यात आली.