Only Jay Shah can explain why Sri Lanka was accommodated against all reason: आशिया चषक २०२३ मध्ये पावसाची मोठी समस्या कायम आहे. भारत-पाकिस्तान सामना वाया गेला असून स्पर्धेतील उर्वरित सामनेही पावसाच्या सावटाखाली आहेत. कोलंबोच्या मैदानी भागात येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कोलंबोमध्ये होणारे सामने दुसऱ्या मैदानावर हलवण्याची चर्चा आहे. आशिया कप सामन्यांदरम्यान पावसाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख नजम सेठी यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

२ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर सेठी यांनी नाव न घेता बीसीसीआयवर निशाणा साधला होता. सेठी यांनी ट्विट करताना लिहिले “पावसाने क्रिकेटचा सर्वात मोठा सामना रद्द झाला. किती निराशाजनक! पण हे आधीच माहीत होते. पीसीबी चेअरमन म्हणून मी आशियाई क्रिकेट परिषदेला यूएईमध्ये आयोजन करण्याचा आग्रह केला होता, पण श्रीलंकेला यजमनापद देण्यासाठी फक्त कारणं दिली गेली. दुबईमध्ये खूप उष्णता आहे, असे ते म्हणाले. पण गेल्या वेळी सप्टेंबर २०२२ मध्ये आशिया चषक खेळला गेला होता. त्याचबरोबर एप्रिल २०१४ आणि सप्टेंबर २०२० मध्ये आयपीएल खेळली गेली होती, तेव्हा तितकेच उष्णता होती. त्यामुळे खेळावरील राजकारण अक्षम्य आहे.”

What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधी मागणीवर ठाम, “अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, त्यांनी राजीनामा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”
beed sarpanch murder case in maharashtra assembly session
बीड: सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण; म्हणाले, “बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…”,
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टवर बांगलादेशच्या नेत्यांची आगपाखड; म्हणाले, ‘आमच्या अखंडतेवर हल्ला’
Chhagan Bhujbal
“जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांचं सूचक वक्तव्य; तर्कवितर्कांना उधाण
Rajat Patidar Protest 3rd Umpire Blunder Then Re reversed The Decision and Third Umpire Apologises
SMAT 2024: रजत पाटीदार तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर वैतागला, मैदान सोडण्यास दिला नकार; माफी मागत पंचांनी बदलला निर्णय
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड

नजम सेठी पुढे म्हणाले, “बीसीसीआयने आमची विनंती मान्य करण्यास नकार दिला. हे पर्याय का नाकारले गेले आणि श्रीलंकेला सर्व कारण, तर्क आणि तर्कशुद्धतेच्या विरोधात का सामावून घेण्यात आले. याबाबत फक्त मिस्टर शाह स्पष्टीकरण देऊ शकतात. आम्ही पाहिल्याप्रमाणे श्रीलंकेतील ठिकाणांची निवड देखील समस्याप्रधान होती.”

हेही वाचा – World Cup 2023: टीम इंडियाचा वर्ल्डकपसाठी आज जाहीर होणार संघ, आशिया कपच्या संघातील कोणत्या खेळाडूंना मिळणार डच्चू?

भारत-पाक सामन्याची मजा पावसाने घालवली –

पावसामुळे भारत आणि पाकिस्तानची मजा घालवली. प्रथम, पावसामुळे दोनदा खेळ थांबवण्यात आला आणि त्यानंतर भारताचा डाव संपल्यानंतर पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. पाकिस्तानसमोर २६७ धावांचे लक्ष्य होते आणि खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत होती. अशा स्थितीत सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा होती, मात्र पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि प्रेक्षकांची घोर निराशा झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डंबुला आणि कँडीमध्ये होणारे सामने हलवले जाऊ शकतात. सुपर-4 व्यतिरिक्त अंतिम सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. कँडी येथील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता भारत आणि नेपाळ यांच्यातील सामनाही पावसाच्या छायेत होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत कोलंबोमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तेथे सामने पूर्ण होणार नाहीत. या कारणास्तव एसीसी एका मोठ्या निर्णयावर विचार करत आहे.

हेही वाचा – World Cup 2023: थ्रीडी प्लेयर विजय शंकर वर्ल्डकप खेळला आणि करिअरच संपलं…

आशिया चषक स्पर्धेतील १३ पैकी चार सामन्यांचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्याचबरोबर श्रीलंकेला नऊ सामन्यांचे यजमानपद मिळाले आहे. पावसाने आधीच एक सामना वाया घालवला आहे. या स्पर्धेतील बहुतांश सामने पावसामुळे वाया गेले. त्यामुळे चाहत्यांना हा थरार पाहायला मिळणार नाही आणि एसीसीला या स्पर्धेतून कोणताही फायदा होणार नाही. गट फेरीत आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. गट फेरीत कोलंबोमध्ये एकही सामना होणार नाही. अंतिम फेरीसह सहा सामने होणार आहेत.

Story img Loader