Najmul Hussain Shanto Scores Two Centuries In One Test: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी मालिकेत, बांगलादेशचा फलंदाज नझमुल हुसेन शांतोने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावातही शतकं झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा शांतो हा मोमिनुल हकनंतरचा दुसरा बांगलादेशी खेळाडू ठरला. त्याच वेळी, अशी कामगिरी करणारा तो सहावा आशियाई खेळाडू ठरला आहे. त्याने विराट-रोहितच्या एका खास यादीत स्थान मिळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोहली-रोहितच्या विक्रमाशी शांतोने साधली बरोबरी –

शांतोने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या डावात शतके झळकावली. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा तो सहावा आशियाई फलंदाज ठरला. विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारे आशियाई फलंदाज आहेत. त्याचबरोबर बांगलादेशचा मोमिनुल हक आणि पाकिस्तानचा इमाम-उल-हक यांचाही या यादीत समावेश आहे. आता या विशेष यादीत नजमुल हुसैन शांतोचाही समावेश झाला आहे.

कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारे आशियाई खेळाडू –

१. विराट कोहली
२. रोहित शर्मा
३. अजिंक्य रहाणे
४. मोमिनुल हक
५. इमाम उल हक
६. नजमुल हुसेन शांतो

हेही वाचा – Rohit Sharma: पत्नीचा फोन वाचवण्यासाठी रोहित शर्माने मारली पाण्यात उडी, रितिकाने शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

अफगाणिस्तानविरुद्ध शांतोची खेळी –

अफगाणिस्तानविरुद्ध शांतोने पहिल्या डावात १७५ चेंडूत १४६ धावांची शानदार खेळी केली. या डावात त्याने दोन षटकार आणि २३ चौकार लगावले. या डावात बांगलादेशसाठी शांतोही सर्वोत्तम धावा करणारा ठरला. त्याच्या खेळीच्या जोरावर या संघाने ३८२ धावा केल्या. दुसऱ्या डावातही शांतोचा चांगला फॉर्म कायम राहिला, त्याने १५१ चेंडूत १५ चौकारांसह १२४ धावा केल्या. २४ वर्षीय युवा फलंदाज शांतोने कसोटी क्रिकेटमधील चौथे शतक तसेच अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्याही नोंदवली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्या डावात ३८२ धावा केल्या होत्या. यानंतर अफगाणिस्तानची फलंदाजी फ्लॉप ठरली आणि संपूर्ण संघ १४६ धावांत गारद झाला. आता दुसऱ्या डावात बांगलादेशने ४ गडी गमावून ४२५ धावांवर घोषित केला आहे. तिसऱ्या दिवसअखेर अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात २ बाद ४५ धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या बांगलादेशने ६१७ धावांची आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Najmul hussain shanto becomes sixth asian player to score double centuries in one test innings vbm