एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत निर्णय
‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वानखेडे स्टेडियमवरील पत्रकार कक्षाला देण्यासंदर्भातील प्रस्तावाला एमसीएच्या कार्यकारिणी समितीने हिरवा कंदील दिला आहे. यासंदर्भात एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत हे ठाकरे कुटुंबीयांची परवानगी घेतील आणि मगच त्याची अंमलबजावणी होईल,’’ अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव पी.व्ही. शेट्टी यांनी कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर दिली.
मार्च महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खंडाळा क्रिकेट क्लब आणि हिंदुजा क्रिकेट क्लब यांनी वानखेडेवरील पत्रकार कक्षाला बाळासाहेबांचे नाव देण्यासंदर्भात पत्र सादर केले होते. परंतु या प्रस्तावावरील चर्चा कार्यकारिणी समितीच्या बैठकीत व्हावी, असे सूतोवाच करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने पत्रकार कक्षाला ठाकरे यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
ठाकरे कुटुंबीयांशी चर्चेनंतरच पत्रकार कक्षाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देणार
एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत निर्णय ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वानखेडे स्टेडियमवरील पत्रकार कक्षाला देण्यासंदर्भातील प्रस्तावाला एमसीएच्या कार्यकारिणी समितीने हिरवा कंदील दिला आहे. यासंदर्भात एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत हे ठाकरे कुटुंबीयांची परवानगी घेतील आणि मगच त्याची अंमलबजावणी होईल,’’ अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव पी.व्ही. शेट्टी यांनी कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर दिली.
First published on: 15-05-2013 at 01:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Name of bal thackeray to press center but first discussion with thackeray family