12 stadiums for the ODI World Cup 2023 to be held in India have been announced: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा भारतीय भूमीवर होणार आहे. मात्र, यावर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात १२ मैदानांवर खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीचे सामने ईडन गार्डन कोलकाता आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.

या १२ मैदानांवर रंगणार विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवले –

अहमदाबाद व्यतिरिक्त, एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचे सामने दिल्ली, बंगळुरू, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेंद्रम आणि गुवाहाटी येथे होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने ईडन गार्डन कोलकाता आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.

India vs Bangladesh Live Streaming Details for Test and T20 Series IND vs BAN Full Schedule Squads
IND vs BAN Live Streaming: ना सोनी, ना स्टार, या चॅनेलवर पाहता येईल भारत-बांगलादेश मालिकेचं थेट प्रक्षेपण
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Team India WTC final 2025 qualification scenario
WTC Final 2025 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण
IND vs BAN Test Series updates in marathi
IND vs BAN : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम
Kevin Pietersen play in Duleep Trophy 2003-04
Duleep Trophy : एकेकाळी इंग्लंडचा केव्हिन पीटरसन दुलीप ट्रॉफीत ठरला होता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
Why is Afganistan Playing Home Matches in India
AFG vs NZ: अफगाणिस्तानचा संघ घरच्या मैदानावरील सामने भारतात का खेळतो? न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका नोएडामध्ये होणार
Duleep Trophy 2024 Live Streaming Details in Marathi
Duleep Trophy 2024 Live Streaming: दुलीप ट्रॉफीचे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार? संघ, वेळापत्रक आणि सर्व डिटेल्स वाचा एकाच क्लिकवर
ICC Announces Womens T20 World Cup 2024 Schedule India vs Pakistan Match on October 6
Womens T20 WC 2024: भारत पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, ICC ने जाहीर केलं T20 World Cupचे वेळापत्रक

तसेच २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला, तर टीम इंडियाचे पॉइंट टेबल किंवा ग्रुपमध्ये स्थान काहीही असले तरीही सेमीफायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली जाईल.

हेही वाचा – MS Dhoni: “माहित होते, तर काय गरज होती…”; जेव्हा धोनीने फटकारले होते विराट कोहलीला, इशांत शर्माने केला खुलासा

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक –

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी बीसीसीआयचे अधिकारी आणि संबंधित राज्यांच्या क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांची अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत आयसीसीच्या नियमांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतातील १२ मैदानांवर खेळवला जाणार आहे, तर या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

याशिवाय उपांत्य फेरीचे सामने ईडन गार्डन कोलकाता आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. त्याचवेळी भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली तर उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून असे मानले जात होते की २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण लवकरच घोषित केले जाईल.