प्रसिद्ध अभिनेता आणि अव्वल नेमबाजपटू नाना पाटेकर गुरगाव, नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय खुल्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला. कर्दापुरच्या सीआरपीएफ अकादमीच्या प्रांगणात ही स्पर्धा सुरू आहे. बिग बोअर प्रकारात नानाने आपले कौशल्य आजमावले. नानाव्यतिरिक्त ऑलिम्पिक पदक प्राप्त गगन नारंगही या स्पर्धेत खेळत आहे. स्पर्धेच्या नेटक्या आयोजनाने भारावून गेल्याचे नानाने पत्रकारांशी सांगितले. गुरगावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही स्पर्धा देशभरातल्या नेमबाजपटूंना आकर्षित करेल यात शंकाच नाही. युवा खेळाडूंनी मोठय़ा संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी सूचना नानाने केली. देशभरातले ६०० नेमबाजपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Story img Loader