पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी नार्को चाचणी करण्यासाठी आपली तयारी असल्याचे रविवारी म्हटले होते. मात्र, त्यासाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचीही नार्को चाचणी करण्याची त्यांनी अट ठेवली होती. ब्रिजभूषण यांची ही अट आपल्याला मान्य असल्याचे बजरंग सोमवारी म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रिजभूषण यांच्यावर सात महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्यांना अटक करण्याची मागणी करत आघाडीचे कुस्तीगीर जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. आंदोलक कुस्तीगिरांनी काही दिवसांपूर्वी सत्य समोर आणण्यासाठी ब्रिजभूषण यांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रविवारी ब्रिजभूषण यांनी ‘फेसबुक’वर पोस्ट लिहीत आपण नार्को चाचणीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच वेळी बजरंग आणि विनेश यांचीही चाचणी करण्याची त्यांनी अट ठेवली.

त्यांच्या या आव्हानाला प्रत्युत्तर देताना बजरंग म्हणाला, ‘‘आमची नार्को चाचणीची तयारी आहे. मात्र, ब्रिजभूषण यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत नार्को चाचणी झाली पाहिजे आणि याचे दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपण झाले पाहिजे. नार्को चाचणीदरम्यान ब्रिजभूषण यांना काय प्रश्न विचारले जातात हे आम्हाला पाहायचे आहे.’’

ब्रिजभूषण यांनी माझी आणि विनेशची नार्को चाचणी करण्यास सांगितले आहे. आमचीच कशाला, ज्या महिला कुस्तीगिरांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, त्यासुद्धा या चाचणीला सामोरे जातील.

– बजरंग पुनिया