Naseem Shah getting emotional Video goes viral: पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया चषक आणि विश्वचषक २०२३ साठी तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाने दणदणीत विजय नोंदवून २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा पराभव होत असल्याचे दिसत होते. मात्र, अखेर नसीम शाहने पाकिस्तानला शानदार विजय मिळवून दिला. यानंतर नसीम शाहला अश्रू अनावर झाले.

इमाम-उल-हक आणि बाबर आझम यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण अखेरच्या षटकांमध्ये संघाने विकेट्स गमावल्या. त्यानंतर नसीम शाहने आपल्या बॅटने करिष्मा दाखवत शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानला विजय मिळवून दिल्यानंतर नसीम शाह खूप भावूक झाल्याचा दिसला आणि त्याला आपल्या आईची आठवण आली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा

विजयानंतर नसीम शाहच्या डोळ्यात तरळले अश्रू –

नसीम शाहने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५ चेंडूत १० धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता आणि हे दोन्ही चौकार शेवटच्या षटकात नसीम शाहने मारले. पाकिस्तानच्या विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – World Cup 2023: सौरव गांगुलीने टीम इंडियाला दिला विजयाचा गुरुमंत्र; म्हणाला, “जर विश्वचषक जिंकायचा असेल, तर…”

या व्हिडिओमध्ये खेळाडू मैदानापासून ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू नसीम शाहचे अभिनंदन करताना दिसत आहेत. पण यावेळी नसीम शाह आपल्या आईला मिस करत होता, व्हिडीओमध्ये नसीम शाह म्हणताना दिसत होते, ‘कदाचित आज माझ्या आईने हे बघितले असते….मला काहीच बोलता येत नाही.’ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना २६ ऑगस्ट रोजी आर.के. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळला जाईल. शेवटच्या वनडेत पाकिस्तानला ३-० ने मालिका जिंकायला आवडेल.

Story img Loader