आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीबद्दल फेसबुक पोस्ट करणे चांगलेच महागात पडले आहे. विराटच्या वर्तणुकीबद्दल केलेल्या फेसबुक पोस्टवरुन युजर्सनी नसीरूद्दीन शाह यांना ट्रोल केले आहे.

शाह यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, विराट कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही, तर जगातील सर्वांत वाईट वर्तणूक करणारा खेळाडू आहे. त्याची क्रिकेटमधील क्षमता त्याच्या अहंकार आणि उद्धट व्यवहारासमोर फिकी पडते. तसं पाहिलं तर माझा देश सोडण्याचा कोणताही हेतू नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

शाह यांच्या या पोस्टनंतर काही युजर्सनी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी काही युजर्स नसीरूद्दीन शाह यांच्यावर चांगलेच भडकले. काहींनी कोहलीची बाजू घेत ऑस्ट्रेलियाच्या टीमला पराभूत करण्यासाठी अशा स्वभावाची गरज असल्याचे म्हटले. अनेकांनी शाह यांच्या मताशी सहमतीही दर्शवली आहे.

काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा एका चाहत्याला भारत सोडून जाण्याचा दिलेल्या सल्ल्यावरुन ट्रोल झाला होता. एका व्हिडिओवरुन हा सर्व प्रकार घडला होता. त्या चाहत्याने सध्याच्या भारतीय खेळाडुंपेक्षा इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन खेळाडुंना पाहणे पसंत करत असल्याचे म्हटल्यानंतर विराट कमालीचा भडकला होता.

Story img Loader