Nasir Hussain says India should learn from Williamson and Azam: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून २०९ धाावांनी पराभव पत्कारावा लागला. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने जागतिक क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला. भारतीय क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीनंतर फलंदाजांवर बरीच टीका होत आहे.दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने मोठे वक्तव्य केले आहे.
कर्णधार नासिर हुसैन म्हणाला की, भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि न्यूझीलंडचा महान खेळाडू केन विल्यमसन यांच्याकडून स्विंग चेंडूंविरुद्ध कसे खेळायचे हे शिकले पाहिजे. भारताचा सलामीवीर शुबमन गिल अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात केवळ १३ धावा करून बाद झाला. रोहित १५ धावा करून आणि पुजारा १४ धावा करून बाद झाला. कोहलीही १४ धावा करून बाद झाला. श्रीकर भरतने ३१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात गिल १८ धावा करून बाद झाला. पुजारा २७ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाला खातेही उघडता आले नाही.
हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलनंतर शुबमन गिलला मोठा धक्का! आयसीसीने ‘या’ चुकीसाठी ठोठावला दंड
भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांची खराब कामगिरी. एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. नासिर हुसेनच्या मते, टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी बाबर आझम आणि केन विल्यमसन यांच्याकडून शिकले पाहिजे.
स्काय स्पोर्ट्सवरील मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, “मी भारतीय फलंदाजांबाबत खूप निराश आहे. या विधानानंतर त्याचे चाहते माझ्यावर खूप टीका करू शकतात. परंतु मला वाटते की त्याच्या टॉप ऑर्डरने बाबर आझम आणि केन विल्यमसन यांच्याकडून शिकले पाहिजे की, चेंडू स्विंग होत असताना वेगवान गोलंदाजांविरुद्ध कसे खेळायचे. दोन्ही फलंदाज खूप उशिरा खेळतात.”
हेही वाचा – WTC Final 2023: पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! आयसीसीने ठोठावला दंड, काय आहे कारण? जाणून घ्या
भारताचा सलामीवीर शुबमन गिल अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात केवळ १३ धावा करून बाद झाला. रोहित १५ धावा करून आणि पुजारा १४ धावा करून बाद झाला. कोहलीही १४ धावा करून बाद झाला. श्रीकर भरतने ३१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात गिल १८ धावा करून बाद झाला. पुजारा २७ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाला खातेही उघडता आले नाही. या सामन्याच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलचे बाद होणे वादग्रस्त ठरले. त्याच्या पकडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.