एजबॅस्टन कसोटीदरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर जे कृत्य केले त्या घटनेकडे मैदानाबाहेर सर्वांचे बरेच लक्ष वेधले गेले. आता इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने इंग्लिश वेगवान गोलंदाजाला बाहेरच्या या सगळ्या गोंधळाकडे दुर्लक्ष करून त्याच्या मैदानावरील कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाँटिंगचे नाव स्लेजिंगमध्ये आणणे ही रॉबिन्सनची चूक होती–  नासिर हुसेन

आयसीसीच्या रिव्ह्यू दरम्यान बोलताना हुसेन म्हणाला, “अ‍ॅशेसच्या सामन्यात खेळाडूला बाद केल्यानंतर असा निरोप देणारा तो पहिला क्रिकेटपटू नाही. काही ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे असा निरोप दिला आहे. मी बरेच वर्ष रिकीच्या इकडून तिकडे पोहोचवल्या जाणाऱ्या स्लेजिंगच्या कमेंटचा आनंद घेतला आहे. आमच्यासोबत रिकी स्काय (स्काय स्पोर्ट्स) येथे काम करत होता आणि त्या रात्री आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फारच विचित्रपणे संवाद होत होते.”

यावर पुढे बोलताना नासिर म्हणाला की, “या संवादात सहभागी असणाऱ्या सर्व ऑस्ट्रेलियन लोकांच्या बोलण्यात ऑली रॉबिन्सन हा एकच उल्लेख होता. मात्र, त्याने केवळ रिकीचा उल्लेख केला. आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्या रात्री खुमासदार संवादाची मेजवानी होती आणि त्यातील रिकीचे काही प्रतिसाद असे होते की मी तुम्हाला सांगू देखील शकत नाही.”

हेही वाचा: Sikandar Raza: ‘जो जीता वही सिकंदर!’ दोनवेळेच्या वर्ल्डकप चॅम्पियनला धूळ चारणारा झिम्बाब्वेचा हिरो म्हणाला, “भारतात जाण्याच्या भुकेने…”

हुसेन यांच्या मते, रॉबिन्सनने आगामी सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि अनावश्यक वादांपासून दूर राहावे. हुसेन म्हणाला, “त्याला कोणत्या बाजूने गोलंदाजी करायला आवडेल आणि कशी गोलंदाजी करायची आहे? यावर तोच ठरवू शकतो. आम्हाला तुमचे कौशल्य दाखवायची वेळ आणू नका ते सर्व जगाला माहिती आहे. जर मी इंग्लंडचा कर्णधार असतो तर मी ऑली रॉबिन्सनला काहीही बोलणार नाही.”

मीडियाशी बोलण्याबाबतीत हुसेन म्हणाले, “मी जर कदाचित मीडियाशी काही बोलत असेल तर मी त्यांना म्हणेल गेल्या काही दिवसांपासून मैदानाबाहेर केवळ ऑली रॉबिन्सन बाबतीतच खूप ऐकत आहे. आमच्या संघाकडे इतर १० क्रिकेटपटू देखील आहेत ज्यांच्याकडे मीडिया लक्ष देऊ शकते. आजकाल समस्या अशी आहे काही वेबसाइट्सपैकी एक अशा गोष्टी लावून धरतात आणि त्यावर चर्चा करीत बसतात. त्यावर इतर मीडिया अशा गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करते आणि नंतर ते सोशल मीडियावर तिखट-मीठ लावून वाढवून सांगितली जाते.”

हेही वाचा: Suryakumar Yadav: BCCIने ‘मिस्टर ३६०’ला दिला सल्ला; म्हणाले, “सूर्यकुमारने टी२० आणि वन डे मध्ये…”

शेवटी हुसेन म्हणतात, “फक्त जो कोणी हे पसरवण्यासाठी प्रभारी म्हणून काम करत आहे त्याला मला एकच सांगायचे आहे, आता यापुढे मला ऑली रॉबिन्सनबद्दल मैदानाबाहेर काहीही ऐकायचे नाही. याच कारणासाठी आम्ही त्याला पुढील चार ऍशेस सामन्यांसाठी प्रेसपासून दूर ठेवू. कारण, ही गोष्ट एकदा मागे लागली की त्याची चर्चा होत जाते आणि ते इतरांचे लक्ष त्या गोष्टीकडे केंद्रित करते.” रॉबिन्सनने बर्मिंगहॅममधील रोमहर्षक मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या संघाकडून खेळताना पाच विकेट्स घेतल्या, परंतु ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शतकवीर उस्मान ख्वाजाची विकेट घेतल्यानंतर त्याने केलेल्या कृत्यासाठी त्याला शिक्षा झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasser hussain opened whats app group responses of ponting who got dragged by robinson into sledging controversy avw
Show comments