आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मधील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियावर बरीच टीका झाली. तसेच सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा ज्या प्रकारे पराभव झाला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन यांनी टी-२० विश्वचषकात संघाच्या स्थितीचे कारण खेळाडूंच्या कमतरतेपेक्षा त्यांच्या मानसिकतेला जबाबदार मानले आहे.
विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. उपांत्य फेरीत इंग्लंडने टीम इंडियाचा १० गडी राखून पराभव केला. आता टीम इंडियाच्या या पराभवाबाबत नासिर हुसेन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचा पराभव खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे नव्हे, तर खराब मानसिकतेमुळे झाला, असे नासेर हुसेन यांना वाटते. तसंच टीम इंडियाला इऑन मॉर्गनसारख्या व्यक्तिमत्त्वाची गरज असल्याचंही हुसेन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम, विराट टॉप १० मधून बाहेर, पाहा यादी
नासेर हुसेन यांनी स्काय स्पोर्ट्सच्या मायकल आथर्टनसोबतच्या चॅट शोमध्ये टीम इंडियाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नासेर म्हणाले की, ”जेव्हा तुम्ही युवा खेळाडूंबद्दल बोलता तेव्हा ते केवळ खेळाडूंबद्दल नसते तर मानसिकतेबद्दल असते. त्यांना जाऊन बेफिकीर होऊन क्रिकेट खेळा, असा म्हणणारा इऑन मॉर्गनसारखा खेळाडू हवा आहे.”
याशिवाय २० षटकांच्या खेळात तुम्हाला २० षटकांचे वेगवान आणि स्मॅशिंग क्रिकेट खेळायचे आहे, असे नासिर म्हणाले. तुम्ही आयपीएलमध्ये खेळता तसे खेळा, न घाबरता आक्रमक क्रिकेट खेळा. तुम्ही भारतासाठी हे करा, काळजी करू नका आणि त्यांना कोणीतरी पाठींबा दिला की ते १२० धावांवर बाद झाले तरी हरकत नाही, आपण पुनरागमन करु.
नॉकआऊट सामन्यात त्याच्यासोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ – हुसेन
इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला की, नॉकआऊट सामन्यात टीम इंडियासोबत असे पहिल्यांदाच घडले आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या जुन्या खेळात परत जावे. तसेच, नासेर यांना वाटते की भारताने द्विपक्षीय मालिकेत निर्भय क्रिकेट खेळले, परंतु २०२२ च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ते तसे करू शकले नाहीत. यामुळे ते इंग्लंडविरुद्ध हरले. याशिवाय भारताने क्रिकेटचा आक्रमक ब्रँड स्वीकारला पाहिजे, असे नासेर हुसेन म्हणाले.